मोहिते पाटील आणि शिंदे माढा विधानसभेच्या निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता ?

टेंभुर्णी ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माढा विधानसभेचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांचे वारसदार माढा विधानसभेच्या निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील यांचे वर्चस्व संपवण्यामध्ये अजितदादा यांची यंग ब्रिगेड टीम सोलापूर जिल्ह्यात तयार झालेली होती. त्यामध्ये संजयमामा शिंदे, प्रशांत मालक परिचारक, दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह अनेक युवकांना सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीय ताकद दिलेली होती. पूर्वीच्या काळी सोलापूर जिल्ह्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटील यांना राजकारण करीत असताना माढा ,करमाळा, सांगोला, पंढरपूर अशा तालुक्यामधील नवीन फळीतील युवकांचे नेतृत्व उभे राहत असताना कसरत करावी लागलेली आहे.

मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये सोलापूर जिल्ह्यात शिंदे परिवारातील बबनदादा व संजयमामा यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली असल्याने सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटील व शिंदे यांचे राजकीय वितृष्ठ संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला माहित आहे. गेल्या दशकापासून मोहिते पाटील व शिंदे यांच्यात राजकीय दरी निर्माण झालेली आहे. सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व संजयमामा शिंदे तर माढा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व बबनदादा शिंदे करीत आहेत. दोन्ही आमदारांचे त्यांच्या परीने मतदार संघातील विकासकामे करण्याचे सुरू आहे‌. मोहिते पाटील यांचा करमाळा व माढा मतदार संघात जास्त वावर सुरू झालेला आहे. विकास कामांचे उद्घाटन लग्न समारंभ, कार्यक्रम व वैयक्तिक भेटीगाठींवर भर वाढलेला आहे.

सध्या मोहिते पाटील गट भाजपमध्ये आहेत तर शिंदे राष्ट्रवादीमध्ये आहेत. शिंदे यांची भाजपमध्ये येण्याची चर्चा सुरू आहे तर, मोहिते पाटील राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा सुरू आहे. माढा विधानसभा मतदार संघात बबनदादा ऐवजी सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे उभे राहण्याची शक्यता आहे. करमाळा मतदार संघात संजयमामा उभा राहतील. मोहिते पाटील व शिंदे पक्ष बदलू अथवा न बदलो मात्र विधानसभेत माढा व करमाळा या ठिकाणी आमने-सामने येण्याची शक्यता सध्या तरी राजकीय हालचालीवरून वाटत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध सौ. पूनम वळकुंदे यांची निवड…
Next articleआमदार शिंदे बंधूंचा जुनी पेन्शन योजने संदर्भातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास पाठिंबा जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here