मोहिते पाटील परिवारातील माजी सरपंच शिवतेजसिंह जनतेच्या मनातील विकासप्रिय सर्वमान्य युवा नेतृत्व.

अकलूज नगर परिषदेचा संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबाबांनी कारभार पहावा, अकलूजकरांची इच्छा.

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू शिवतेजसिंह उदयसिंह मोहिते पाटील यांनी आशिया खंडातील सर्वात मोठी असणारी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व जिल्हा परिषदेचे माजी पक्ष नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सहकार्याने अकलुज ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकास करून लोकाभिमुख ग्रामपंचायत चालवलेली असल्याने जनतेच्या मनात विकासप्रिय सर्वसामान्य जनतेचे युवा नेतृत्व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज नगरपरिषदेचा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार पाहावा, अशी अकलूजकरांची इच्छा शिवबाबांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे‌. हीच अकलूजकरांची इच्छा पूर्ण झाल्यास शिवबाबांच्या वाढदिवसाला खऱ्याअर्थाने शुभेच्छा ठरतील.

विजयदादा आणि बाळदादा यांनी कमी वयामध्ये शिवबाबा यांच्याकडे अकलूज ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची धुरा दिलेली होती. शिवबाबांनी रणजीतदादा आणि धैर्यशीलभैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकासकामे राबवून लोकाभिमुख ग्रामपंचायत केलेली होती. ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्याकरता शिवबाबानी अहोरात्र परिश्रम घेतले होते. अकलूजचे नियोजन करून पुणे, मुंबई या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहात होते. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या तिसर्‍या पिढीमध्ये सर्वात लाडके असणारे शिवबाबा यांनी कमी वयात पोक्त अनुभव असल्यासारखे ग्रामपंचायतीचा आदर्श कारभार केलेला आहे.
मोहिते पाटील परिवारातील माळशिरस तालुक्याचा पंचायत समितीच्या माध्यमातून माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील कारभार पाहत आहेत. सोलापूर जिल्ह्याचा धैर्यशील मोहिते-पाटील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कारभार पाहत आहेत. महाराष्ट्र राज्यात विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील विधान भवन व विधान परिषदेमध्ये कामकाज पाहत आहेत. अकलूज नगरपरिषदेचा कारभार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी कारभार पहावा, अशी अकलूजकरांची इच्छा आहे.

शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा वाढदिवस 21 फेब्रुवारी रोजी असतो. नगर परिषदेमध्ये शिवबाबांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्यास खऱ्या अर्थाने शिवबबाबांना वाढदिवसाची विजयदादा व बाळदादा यांच्याकडून भेट दिल्यासारखे होईल, असे सर्वसामान्य अकलूजकर जनतेची अपेक्षा आहे.

अकलूजचे माजी सरपंच व अकलूज नगरपरिषदेचे भावी नगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या बारामती झटका परिवार यांचे कडून लाख लाख शुभेच्छा !! शिवबाबा आपणास उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व अकलूजचे ग्रामदैवत अकलाई मातेस साकडे. जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण होवो हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !!!

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची वेळापूरतील तुळशी चहास सदिच्छा भेट.
Next articleनातेपुते नगरपंचायतमध्ये कृष्णा, भिमा, निरा, राजकीय प्रवाह एकत्र आल्याने विकासाची गंगा वाहणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here