मोहिते-पाटील यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे महाळुंग नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार अडचणीत.

भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा अपक्ष मोहिते पाटील समर्थक उमेदवार यांना छुपा पाठिंबा.


महाळुंग ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील माढा विधानसभा मतदारसंघातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोहिते-पाटील यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अडचणीत आले आहेत .भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवार मोहिते पाटील यांचे समर्थक यांना छुपा पाठिंबा असल्याचे महाळुंग परिसरात चर्चेला उधाण आलेले आहे.
महाळुंग ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याकरता संपूर्ण गाव एक झालेले होते .ग्रामपंचायत निवडणूक लागलेली होती त्यावेळेस शिवरत्न बंगला येथे मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक निर्णय झालेल्या होता निवडणूक लढवायची नाही .
महाळूंग श्रीपुर मध्ये अनेक राजकीय पक्ष, संघटना, गट गट असताना सर्वांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला गावाची एकी पाहून शासनाने ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर केले.
नगर पंचायतीची निवडणूक सुरू झाली माढा लोकसभा मतदार संघाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महाळुंग श्रीपुर नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या साठी बैठक घेतली स्थानिक गट यांच्यासोबत शिवरत्न येथे जबाबदार मोहिते पाटील घराण्यातील त्यांच्यासमवेत बैठका झाल्या मोहिते पाटील समर्थक तीन मोठे गट आहे आहेत व छोटे असंख्य आहेत. तिनीही गटाचे एकमत न झाल्याने स्वतंत्र आघाडी करून लढण्याचा अंतर्गत निर्णय झालेला असावा त्यामुळे भारतीय जनता पार्टीने पक्षाचे चिंन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना बी फार्म दिलेली आहेत. पुणे येथील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली होती त्या बैठकीमध्ये स्थानिक आघाडी करून निवडणूका लढविण्याची कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे मोहिते पाटील यांच्याकडून आग्रह असल्यामुळे देवेंद्र फडवणीस यांनी तो मनसोबा उधळून लावला आणि महाळुंग नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेतला.
मोहिते पाटील यांचे तीन गट निवडणुकीत उभे आहेत भीमराव रेडे पाटील, नानासाहेब मुंडफणे, अनिल जाधव, असे तीन गट आहे त्यापैकी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अनिल जाधव यांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीत उतरलेले आहेत तर भीमराव रेडे पाटील व नानासाहेब मुंडपणे दोन्ही गट अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. मोहिते पाटलाचे अपक्ष दोन्ही गटांच्या निवडणुकीच्या बॅनर व पोस्टर पोम्प्लेट यावर मोहिते पाटील परिवारातील महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांचे फोटो आहेत मात्र भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या बॅनर पोस्टर व पोम्प्लेट वर मोहिते पाटील परिवारातील कोणाचाच फोटो अथवा नाव नाही. भारतीय जनता पार्टी कडून अनिल जाधव यांच्या गटातून उभे राहिलेले मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक असतानासुद्धा त्यांना फोटो अथवा नाव छापू नये अशी सक्त ताकीद असल्याची चर्चा महाळूंग पंचक्रोशीत रंगलेली आहे.
मोहिते पाटील यांना महाळूंग नगर पंचायत मध्ये भारतीय जनता पार्टी पेक्षा स्वतःच्या गटाचे अस्तित्व करण्याचा हेतू असावा असे ही राजकीय विश्लेषकांचे मत आहे कारण मोहिते-पाटील यांचा शब्द प्रमाण मानला जातो ” मोहिते पाटील बांधतील ते तोरण आणि ठरवतील ते धोरण ” अशी कार्यकर्त्यांची भावना असते असा आज पर्यंतचा राजकीय इतिहास आहे. नगरपंचायत च्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे तीन गटाला पाच पाच जागा देऊन उर्वरित दोन जागा आरपीआय पक्षाला देऊन निवडणूक लढविणे मोहिते-पाटलांना शक्य होते परंतु असे झालेले नाही. कार्यकर्त्यांची एकमत होत नाही असे म्हणणे 50 वर्ष राजकारण करणाऱ्या मोहिते पाटलांना अशोभनीय आहे. कारण नेत्यांचा आदेश मानणं कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे जर असे घडत नसेल तर नेता आणि कार्यकर्ता नात चुकीच आहे.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडे वरिष्ठ नेत्यांची डोळेझाक झालेली आहे स्थानिक भाजपचे नेते असणारे मोहिते पाटील यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे नगरपंचायत चे भाजपचे उमेदवार अडचणीत आलेली आहे जे भाजपचे उमेदवार निवडून येतील ते पंचायत समितीचे सदस्य अनिल जाधव व त्यांचे सहकारी यांच्या स्वबळावर निवडून येतील असे निवडणुकीचे चित्र निर्माण झालेली आहे. सध्या तरी तीन गटाचे ताकद असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणुकीत वर्चस्व दिसून येत आहे. भाजपचे महाळुंग परिसरातील तालुका व जिल्हा पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख अपक्ष उमेदवारीत व अपक्ष उमेदवार यांचे समर्थन करीत आहेत. राष्ट्रवादीची प्रचाराची जाहीर सांगता सभा आज दुपारी एक वाजता होत आहे. रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची वेळ आहे भाजपचे वरिष्ठ नेते प्रचाराची सांगता सभा ठेवतील का ? महाळुंग श्रीपुर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मोहिते पाटील यांच्या भूमिकेविषयी काय निर्णय घेतील याकडे तालुक्‍यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहापुरुषांचा अवमान करणाऱ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोमय्या यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही – सचिन जगताप, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
Next articleप्रभागातील समस्या व जनतेच्या अडचणी सोडविला असल्यामुळे मंगल गेजगे यांचा विजय निश्‍चित : संतोषआबा वाघमोडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here