विरोधकांवर विश्वास नसल्याने सत्तेच्या राजकारणात मोहिते-पाटील टिकलेले आहेत.
माळशिरस ( बारामती झटका )
सहकार महर्षी यांनी प्रतिकूल परिस्थितीत सहकारी संस्था निर्माण केल्या वाढवल्या ,टिकवून ठेवल्या सभासदांचा व जनतेचा विश्वास संपादन केला मात्र गेल्या दशकापासून मोहिते-पाटील यांच्या साखर कारखाना, दूध संस्था, पतसंस्था, कुकुट पालन, सुत गिरण या सहकारी संस्थावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, तरीसुद्धा सत्तेच्या राजकारणात मोहिते पाटील टिकलेले आहेत ते फक्त विरोधकांवर विश्वास नसल्यामुळे जनतेच्या जीवावर राजकारणात यशस्वी असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.
माळशिरस तालुक्याला विशेष करून अकलूजला सहकाराची पंढरी म्हणून ओळखली जात असत संपूर्ण महाराष्ट्रात सहकाराचा आदर्श असणाऱ्या सहकारी संस्था माळशिरस तालुक्यात निर्माण झालेल्या होत्या.माळशिरस तालुक्यातील अनेक सहकारी संस्था बंद पडलेल्या आहेत अनेक संस्था डबघाईला आलेले आहेत किती जरी संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.जनता सहकारी संस्थेत भरडली गेली असल्याने सुरू असलेल्या संस्था साखर कारखाना दूध संघ, पतसंस्था यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. मोहिते-पाटील यांच्या संस्थेवर संचालक असणारे व त्यांचे नातेवाईक यांचा कारखान्याला ऊस जिल्हा जात नाही. दूध संघाला दूध दिले जात नाही व पतसंस्थेत पैशाचे व्यवहार केले जात नाहीत मोहिते-पाटील यांच्या संस्था सोडून इतर संस्थांमध्ये व्यवहार सुरू आहेत दररोज मोहिते-पाटील यांच्या गाडीमध्ये बसणाऱ्या लोकांचे व राजकीय सल्ले देणारे लोकाचे सुद्धा दुसऱ्या संस्थेकडे व्यवहार सुरू आहेत. विरोधी गटाचा मेळ व त्यांच्यावर विश्वास नसल्याने सत्तेच्या राजकारणात मोहिते-पाटील टिकलेले आहेत. मोहिते-पाटील यांच्या सहकारी संस्थावर जनतेचा विश्वास नाही. मात्र राजकारणात जनतेचा विश्वास संपादन केलेला असल्यामुळे राजकारण सुरू आहे .भविष्यात विरोधी गटाकडून विश्वास संपादन झाल्यास मोहिते-पाटील यांचे राजकीय भवितव्य अंधारात येऊ शकते असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng