माढा (बारामती झटका)
माढा तालुका विधी सेवा समिती व माढा तालुका वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने भारतभर जागरूक अभियान व पोहोच व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आज मौजे रांझणी ता. माढा येथे लोकन्यायालयात आयोजित केले होते. त्यावेळी न्यायाधीश एम.एस. काझी साहेब यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती श्री. संजयदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून परिसरातील लोकांचे तंटे आपआपसात मिटवण्यात आले.

यावेळी पंचक्रोशीतील वादी प्रतिवादी उपस्थित होते. तसेच मे. न्यायाधीश काझी साहेब यांनी सर्व उपस्थित लोकांना कायदेविषय मार्गदर्शन केले व फिरते न्यायालयाविषयीचे महत्व सांगितले. कोणावर ही अन्याय न होता खटले सोडवण्यविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संजयदादा पाटील, कानडे साहेब, भादुले साहेब, सचिन झेंडे, रणजित पाटील आदि मान्यवर लोकांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास टेंभूर्णी पोलीस स्टेशनचे श्री ओमासे साहेब, पोलीस निरीक्षक कुंभार साहेब, ॲड. भादुले साहेब, ॲड. संतोष कानडे, जहागीर साहेब, सुनील धोत्रे, निलेश भोसले, रणजित पाटील, माने साहेब, भांगे साहेब आदींसह पोलीस स्टेशन व कोर्ट अधिकारी उपस्थित होते. तसेच सरपंच सौ. सोनाली माने, सौ. संगीता पाटोळे, रोहित गायकवाड, अक्षय पाटील, नेताजी चमरे, भारत मस्के, महादेव जाधव, भिवाजी माने, पांडुरंग माने, डॉ. विनोद चव्हाण, नितीन मस्के, हिरा शिद, अंकुश जाधव, बबन चव्हाण, विजय सरवदे, प्रशांत पाटील, मल्हारी गवळी, हरिदास मोहिते, विजय पतूले, वरूण पाटोळे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल. एम. शेख ग्रामविकास अधिकारी यांनी केले व आभार श्री. कुंभार साहेब यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत रांझणी भिमानगर यांनी परिश्रम केले, त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng