पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी लक्ष देऊन वाहनधारकावर कार्यवाही करून वाळू ठेकेदारांच्या मुसक्या आवळायला हव्यात.
माळशिरस ( बारामती झटका )
म्हसवड येथील वाळू ठेकेदार यांचेकडून बेकायदेशीर वाळू उपसा करून माळशिरस तालुक्यात वाळूचा सुळसुळाट सुरू असून वाळूमाफियांनी धुमाकूळ घातलेला आहे. माळशिरस तालुक्यातील पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी लक्ष देऊन बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कार्यवाही करून म्हसवड येथील बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदाराच्या मुसक्या आवळायला हव्यात, अशा मागणीने जोर धरलेला आहे.
म्हसवड येथील वाळूचा लिलाव झालेला आहे. सदरच्या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. त्याठिकाणची बेकायदेशीर वाळू बेसुमार माळशिरस तालुक्यात येत आहे. एकाच पावतीवर दिवसभर व दुसऱ्या दिवशी वाहनधारक वाळू वाहतूक रात्रंदिवस करीत आहे. याकडे उपविभागीय अधिकारी पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते व माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून बेकायदेशीर वाळू तालुक्यात येत आहे. यासाठी उपविभागीय कार्यालय व नातेपुते आणि माळशिरस पोलीस स्टेशनचे भरारी पथक नेमणे गरजेचे आहे. त्यांच्या जोडीला प्रांताधिकारी व तहसीलदार यांनीसुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.
एकाच पावतीवर वाहनधारकांनी बेसुमार वाळू उपसा करून माळशिरस तालुक्यात धुमाकूळ घातलेला आहे. यासाठी वाळू ठेकेदार व वाहनधारक यांच्यावर कारवाई करावी, अशी जनतेतून मागणी होत आहे. रात्री-अपरात्री भरधाव वेगाने वाळूची वाहतूक जोमात सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng