यशस्वी उद्योग व्यवसाय करून सामाजिक बांधिलकी जपत जनतेची सेवा करणारे समाजसेवक दत्तात्रय शेळके.

राजकारणाचा वापर समाज कारणासाठी वापरून समाजासमोर आदर्श उभा करणारे उद्योजक दत्तात्रय शेळके यांचे आदर्शवत कार्य.


गुरसाळे ( बारामती झटका )


गुरसाळे तालुका माळशिरस येथील सर्वसामान्य गरीब कुटुंबामध्ये जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिलांच्या कष्टावर आणि गरिबीच्या जाणिवेतून दत्तात्रय शेळके यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरी न करता उद्योग व्यवसायामध्ये आपली प्रगती करून यशस्वी उद्योग व्यवसाय करून सामाजिक बांधिलकी जपत जनतेची सेवा करणारे ग्रामीण भागातील समाज सेवक दत्तात्रेय शेळके ठरलेले आहेत राजकारणाचा वापर समाजकारणासाठी वापरून समाजासमोर आदर्श उभा करणारे उद्योजक दत्तात्रय शेळके यांचे आदर्शवत कार्य सुरू असल्याने समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
उद्योजक दत्तात्रय शेळके आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी व गरिबीची जाण कायम लक्षात ठेवून यांचा आज पर्यंत उद्योग व्यवसायामध्ये प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता आहे. समाजकारण करताना राजकारणाची जोड असावी यासाठी माळशिरस पंचायत समितीच्या निवडणुकीत पत्नी सौ.संगीता शेळके यांना उभे करून अटीतटीच्या या निवडणुकीत दैदिप्यमान विजय संपादन केलेला होता. राजकारणामध्ये काही मिळवण्याचा हेतू नव्हता त्यामधून जनतेची सेवा करण्याचा उद्देश होता पत्नी पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर कधीही ही पंचायत समितीच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. कितीतरी वेळा स्वखर्चाने मतदार संघात गुरसाळे ,कुरबावी, एकशिव, शिंदेवाडी, देशमुखवाडी, डोंबाळवाडी ,हनुमानवाडी, तांबेवाडी या गावांमधील रस्ते पाण्याची सुविधा यासाठी स्वखर्चातून कामे केलेली आहेत. आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सुटल्या पाहिजेत कोणताही स्वार्थ डोळ्यासमोर न ठेवता जनतेची सेवा करण्याचे काम नेहमी सुरू आहे.
कोरोना महामारी च्या या काळामध्ये सर्वसामान्य जनता भयभीत झालेली होती लोकांचे खूप हाल झाले कोरोना बाधित व आजारी पेशंट ना आधार देण्याचे काम केलेले आहे कितीतरी लोकांना दवाखान्यात आर्थिक मदत करून काही लोकांच्या घरातील पेशंट दवाखान्यात असल्यानंतर जेवणाची अडचण भासत होती अशावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोची ग्रामीण रुग्णालय नातेपुते उपकेंद्र धर्मपुरी अशा ठिकाणी सकाळ-संध्याकाळ जेवणाचे डबे पोच करण्याचे काम केलेले आहे आहे. कोरोना काळात अनेक लोकांच्या हाताला काम नव्हते उद्योग-व्यवसाय बंद होते अशा कठीण परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचे काम केले होते. गरीब परिस्थितीमुळे अनेक लोकांची दवाखान्याची बिले सुद्धा भरलेली आहेत कुरबावी ,भिमनगर धर्मपुरी येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना शासकीय निधीची वाट न पाहता स्वखर्चातून बोर घेऊन त्यामध्ये मोटर टाकून पाईपलाईन करून लोकांच्या पिण्याच्या पाण्याची अडचण दूर केली होती मतदारसंघांमध्ये अनेक गावांमध्ये स्वखर्चाने गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर फवारणी केली होती.
महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी यामध्ये सहभाग घेऊन तरुणांना नेहमी आर्थिक सहकार्य केले जाते धार्मिक कार्यामध्येही मोठा सहभाग असतो कुरबावी येथे 1 नोव्हेंबर रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे सामाजिक बांधिलकी जपत त्यादिवशी संपूर्ण गावाला जेवणाचे आमंत्रण देण्यात येणार असून संपूर्ण गावात चूल बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
उद्योजक दत्तात्रय शेळके यांनी स्वकष्टातून प्रामाणिकपणे आपल्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करून समाजाची सामाजिक बांधिलकी जपलेली असल्यानेभव्य नाईट पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर 20 21 रोजी सायंकाळी सहा वाजता विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, एकशिवचे सरपंच शहाजीदादा धायगुडे, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार सोनवलकर, इंन्स्ट्रक्टर मार्शल कॅडेट फोर्सचे सिंहान : राजू गोसावी ,साई इंटरप्राईजेस पुणेचे सतीशतात्या ढेकळे,शुटींगबॉलचे कर्णधार आमीर काझी माळशिरस आद्य क्रांतिवीर भावी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष लखनभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष संजयभाऊ चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्ष अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बशीरभाई काझी, मार्शल कॅडेट कोर्स चे संचालक गणेश बोराटे सर, आकुर्डी चे उद्योजक प्रवीण शेठ पांढरकर, विजय सोप इंडस्ट्रीजचे व पिरळे गावचे सरपंच संदीप रामलिंग नरोळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. क्रिकेट बक्षीस वितरण समारंभात एकशिव ग्रामस्थांच्या वतीने आदर्श समाजरत्न पुरस्कार उद्योजक दत्तात्रय शेळके यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleएकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीच्या लढ्यात सामिल व्हा. – रणजित बागल
Next articleस्वेरीच्या तीन विद्यार्थीनीचे स्प्रिंजर जर्नलमध्ये पेपर प्रकाशित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here