सातारा जिल्ह्यात युवा मोर्चाच्या बैठकांमुळे उत्साह
सातारा (बारामती झटका)
सातारा जिल्ह्यात युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. विक्रांतदादा पाटील यांच्या नेतत्वाखाली प्रदेश सचिव व सातारा प्रभारी श्री. अमृत मारणे व सहप्रभारी श्री. सचिन जायभाये, युवा नेते व प. महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुशांतजी निंबाळकर यांनी जिल्हाध्यक्ष श्री. निलेश नलावडे यांच्या समवेत वाई, खंडाळा, कराड तसेच सातारा शहर कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत युवा मोर्चा सर्व मंडल अध्यक्ष आणि कार्यकर्ता यांना संघटनेचे पदाधिकारी यांनी ग्रामीण भागात युवा मोर्चा तळागाळापर्यंत पोहचला पाहिजे. यासाठी मेहनत घेतली पाहिजे. राज्यामध्ये सुरू असलेले महाविकास आघाडीचे घोटाळे यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. अभद्र आघाडी सरकारने राज्यातील जनतेला वेठीस धरले आहे. म्हणून पुन्हा भाजपा सरकार आणण्यासाठी जनतेमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे. हे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील व युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री. विक्रांतदादा पाटील यांचे विचार युवक बैठकीत मांडले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
