प्रतिकूल परिस्थितीत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून शुभम यांनी पूर्ण केले – युवा नेते अक्षयभैया भांड.
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते ता. माळशिरस येथे युपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल शिंदेवाडी गावचा शुभम पांडुरंग जाधव यांचा सत्कार पै.अक्षयभैय्या भांड मित्र परिवाराच्यावतीने नातेपुते येथील संपर्क कार्यालयात करण्यात आला. यावेळी नातेपुते नगपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, व आयडीबीआय बँकेचे मॅनेजर फडके साहेब यांचाही सत्कार करण्यात आले.

शुभम जाधव यांच्या यशाबद्दल बोलत असताना युवानेते अक्षयभैय्या भांड म्हणाले की, माळशिरस तालुक्याचे नाव उच्च ठिकाणी नेण्याचे काम शुभम यांनी केले आहे. त्यांचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. शिंदेवाडीसारख्या छोट्याश्या गावातून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते स्वप्न त्यांनी पुर्ण केले. मनामध्ये जिद्द, चिकाटी असल्यानंतर यश संपादन होते, आजच्या तरूणांसमोर त्यांनी एक आदर्श ठेवला आहे. उपस्थित सर्व अधिकारी वर्गाबद्दल नेहमीच अभिमान असेल, असे गौरवोद्गार सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना सांगितले. यावेळी ज्येष्ठनेते युवराज वाघमारे, रियाज शेख, जावरे साहेब, अक्षय चौघुले, नितीन बडवे, उदय बरडकर, दत्तात्रय बोत्रे, रवीराज बोत्रे, किरण कर्चे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng