माळशिरस शहरात ‘शौर्य डेंटल’ या दवाखान्याचे दीपावलीच्या शुभमुहूर्तावर भव्य उद्घाटन समारंभ संपन्न

माळशिरस ( बारामती झटका )
कर्जत जामखेडचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट युवा आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभहस्ते माळशिरस शहरात बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी ‘शौर्य डेंटल क्लिनिक’ या दवाखान्याचे दिमाखात उद्घाटन दीपावलीच्या शुभमुहूर्तावर बुधवार दि. 03/11/2021 रोजी सकाळी 11 वाजता उत्साही वातावरणात उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर, अकलूज क्रिटिकेअरचे डॉ. समीर बंडगर, लोणंद फलटण रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, माळशिरस नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, गुरुकुल विद्या मंदिर, गोकळीचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण हरणावळ, राष्ट्रवादीचे नेते विकासदादा धाईंजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, पंचायत समिती सदस्य अजय सकट, ज्येष्ठ नेते बाजीराव माने पाटील, समता परिषदेचे राजाभाऊ हिवरकर, किसान सेलचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र गोरड, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे अध्यक्ष अनिकेत काळे, माळशिरस तालुका सरपंच संघटनेचे सचिव उंबरे दहीगावचे सरपंच विष्णुपंत नारनवर, ओबीसी अध्यक्ष सोमनाथ पिसे, काँग्रेसचे सरचिटणीस शामराव बंडगर, ग्रामपंचायत सदस्य विकास बंडगर आदी मान्यवरांसह माळशिरस पंचक्रोशीतील नागरिक व वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर उपस्थित होते.

युवा आमदार रोहितदादा पवार यांनी उद्घाटन केल्यानंतर सदर दाताच्या दवाखान्याची संपूर्ण पाहणी केली. सुसज्ज जागा, अद्यावत मशनरी तसेच परिसरातील नागरिकांची या सोयीसुविधाने अडचण दूर होणार असल्याने डॉ. सौ. कीर्ती हरणावळ बंडगर व डॉ. श्री. नवनाथ बंडगर यांना शुभेच्छा देऊन दवाखान्याचा भविष्यामध्ये उज्वल काळ यावा, यासाठी आपण रुग्णांची सेवा करावी अशा भरभरून शुभेच्छा आमदार रोहितदादा पवार यांनी बंडगर दांपत्य यांना दिल्या. यावेळी युवा आमदार रोहितदादा पवार यांचा बंडगर परिवाराच्यावतीने सन्मान करण्यात आला.’शौर्य डेंटल क्लिनिक’ या दवाखान्यामध्ये डॉ. सौ. कीर्ती हरणावळ बंडगर यांचे बीडीएस शिक्षण पूर्ण झालेले असल्याने दंत चिकित्सक म्हणून त्या काम पाहणार आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण गोखळी या ठिकाणी झालेले आहे. पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्था, इंदापूर, तर अकरावी आणि बारावी टीसी कॉलेज बारामती तर डिग्री एस.एम.बी.टी. डेंटल कॉलेज संगमनेर येथे पूर्ण केलेले आहे. डेंटल ची डिग्री घेतल्यानंतर बीडीएस डॉ. अरुण गर्डे यांच्याकडे एक वर्ष प्रॅक्टिस केली त्यानंतर एमडीएस डॉ. पंकज दोशी यांच्याकडे दोन वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे. कीर्ती हरणावळ यांचे आई-वडील सर्वसामान्य कुटुंबातील शेतमजूर होते. आई सौ. फुलाबाई आणि वडील साहेबराव यांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये काबाड कष्ट करून आपल्या मुलांना सुशिक्षित केले. किर्ती बीडीएस डॉक्टर झाल्या, थोरले बंधू लक्ष्मण हरणावळ जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक होते. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून स्वतःची गुरूकुल विद्यामंदिर गोखळी येथे वीस ते पंचवीस मुलांवर शिक्षण संस्था सुरू केली. आज संस्थेमध्ये 900 विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत. यांचे लहान बंधू भरत हे कंपनीमध्ये नोकरी करीत होते त्यांनी ही नोकरी सोडून गुरुकुल विद्या मंदिराचा वाढलेला व्याप सांभाळण्याचे काम सुरू केले आहे. डॉ. किर्ती यांचा विवाह तिरवंडी येथील बी.एच.एम.एस. डॉ. नवनाथ ज्ञानेश्वर बंडगर यांच्याशी झालेला आहे.

डॉ. नवनाथ बंडगर यांनीही प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिरवंडी गावातील सौ. कांताबाई बंडगर व श्री. ज्ञानेश्वर सोपान बंडगर यांच्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे. डॉ. नवनाथ यांनी सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरवंडी येथे घेतलेले आहे. दहावीपर्यंत भैरवनाथ विद्यालय मेडद, अकरावी ते बारावी गोपाळराव देव प्रशाला माळशिरस येथे पूर्ण केले. डिग्री डी.डी. मगदूम जयसिंगपूर येथे पूर्ण केले. त्यानंतर ए.आर. पाटील हॉस्पिटल मिरज येथे एक वर्ष प्रॅक्टिस केली. त्यानंतर अकलूज येथील सुप्रसिद्ध डॉ. समीर बंडगर सर यांच्याकडे एक वर्ष प्रॅक्टिस केली. त्यानंतर गेल्या साडेतीन वर्षापासून तिरवंडी येथे श्रावणी हॉस्पिटल नवनाथ बंडगर यांचे स्वतःचे हॉस्पिटल आहे. माळशिरस शहराच्या नजीक असणारे तिरवंडी येथील वैद्यकीय क्षेत्रामध्ये बंडगर परिवारातील सतरा डॉक्टर कार्यरत आहेत. अनेक ठिकाणी आपापले व्यवसाय सुरू आहेत. नवनाथ बंडगर यांचा तिरवंडी येथे दवाखाना सुरू आहे. पत्नी डॉ. सौ. कीर्ती हरणावळ बंडगर यांच्यासाठी ‘शौर्य डेंटल क्लिनिक’ या दाताचा दवाखाना युवानेते आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभहस्ते दीपावलीनिमित्त शुभारंभ केलेला आहे.

या दवाखान्यामध्ये दंत व मुख रोगनिदान, दाताचा एक्स-रे, दात काढणे, अक्कलदाढ काढण्याची शस्त्रक्रिया, ॲडव्हान्स रूट कॅनल ट्रीटमेंट, दात कवळी बसवणे, हिरड्यांची शस्त्रक्रिया, लहान मुलांचे दाताचे उपचार, क्लिप बसवून वेडेवाकडे दात सरळ करणे, स्माईल डिझाईनिंग, डेंटल लाॅमिनेट्स अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध असल्याने माळशिरस पंचक्रोशीतील लोकांचे दाताचे प्रश्न मिटणार असल्याने अनेक लोकांनी शौर्य डेंटल क्लिनिकला भेटून शुभेच्छा दिल्या. माळशिरस शहरातील अनेक नामांकित डॉक्टर्स व बंडगर परिवारातील डॉक्टर यांनी नवीन दवाखान्याला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामराव बंडगर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng