मांडवे ग्रामपंचायत सदस्य युवा उद्योजक रितेश पालवे पाटील यांचा उत्कृष्ट व दर्जेदार रस्ता बनविल्यामुळे सिद्धिविनायक गणेश मंडळांकडून सन्मान संपन्न.
मांडवे ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील मांडवे गावचे कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्य युवा उद्योजक श्री. रितेश पालवे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने मांडवे-कण्हेर रोडचा पहिला टप्पातील रस्त्याचे दर्जेदार व गुणवत्तापुर्ण रस्त्याचे काम करून घेतल्याबद्दल श्री सिद्धिविनायक गणेश मंडळ ( पाटीलमळा ) मांडवे यांच्याकडून युवा उद्योजक रितेश बबनराव पालवे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आण्णा पाटील, पंढरी पालवे, केंगार महाराज, नाना गोफणे, बापू पाटील, नामदेव पालवे, राजेंद्र पालवे, संजय गोफणे, अविदास पालवे, दिलीप गायकवाड, हनुमंत कोकरे उपस्थित होते.

सत्कार समारंभ प्रसंगी युवानेते आण्णा पाटील यांनी युवा उद्योजक यांनी उत्कृष्ट व दर्जेदार रस्ता तयार करून अनेक दिवसाची जनतेची अडचण दूर केलेली आहे. रस्त्याचे काम करीत असताना कामामधून पैसे मिळावी, ही अपेक्षा न ठेवता पदरचे पैसे सेवाभावी वृत्तीने गुंतवून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. युवा उद्योजक रितेश पालवे पाटील यांचा आदर्श समाजातील तरुणांनी घ्यावा, असे गौरवोद्गार आण्णा पाटील यांनी सत्कार समारंभ प्रसंगी उद्गारले होते.

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे माजी सरपंच बबनराव गणपत पालवे पाटील उर्फ बबनबापू यांचे सुपुत्र रितेश पालवे पाटील यांनी उच्च शिक्षण घेऊन पुणे येथे उद्योग व्यवसाय सुरू केला आहे. आपल्या शिक्षणाचा व आपण ज्या समाजामध्ये परिसरांमध्ये जन्मलो, वाढलो, त्या परिसरासाठी काहीतरी करणे गरजेचे असते. आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतूने रितेश यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सहभाग घेऊन सर्वाधिक विक्रमी मतांनी ग्रामपंचायत सदस्य झालेले होते. योगायोगाने ज्या पॅनलमधून निवडणूक लढले, त्या पॅनलची सत्ता मांडवे ग्रामपंचायतमध्ये स्थापना झालेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पत्रव्यवहारामुळे रितेश यांनी अनेक दिवसापासून मांडवे ग्रामस्थांची इच्छा होती की, मांडवे कन्हेर रस्ता डांबरीकरण होऊन दळणवळणासाठी सुस्थितीत रस्ता असावा. या मागणीचा पाठपुरावा करून रितेश पालवे पाटील यांनी सदरच्या रस्त्यावर जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करून नेतेमंडळींकडे पाठपुरावा केला.

सदरच्या रस्त्यावर निधी मंजूर झाल्यानंतर रितेश यांनी सदर रस्त्याचे काम स्वतः लक्ष घालून करण्याचे ठरविले. सदर कामाचे अंदाजपत्रक न पाहता रस्त्यावरील पहिल्यांदा बेक क्लीन करून घेतले डब्ल्यू बी एम करून त्यावर बीबीएम करून कार्पेट करून घेतले. दोन्ही बाजूला मुरूम टाकून रस्ता तयार करताना मंजूर झालेल्या निधीबरोबर स्वतःचा निधी किती जातोय याकडे, लक्ष न देता रस्ता कसा दर्जेदार व गुणवत्तेचा होईल याकडे लक्ष्य दिलेले होते.

रस्ता उत्कृष्ट व दर्जेदार केलेला असल्याने मांडवे पंचक्रोशीतील सदर रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात होते. त्यामुळे स्थानिक नागरिक यांनी रितेश पालवे पाटील यांचा सन्मान करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे सिद्धिविनायक गणेश मंडळांनी पाटील मळा या ठिकाणी सत्काराचे आयोजन केलेले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng