माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस शहरातील युवा उद्योजक श्री. सचिनतात्या देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त देशमुख परिवार व सिद्धिविनायक डेव्हलपर्स यांच्यावतीने अनाथ गरजू मुलांना जीवनावश्यक वस्तू, कपडे, खाऊ व शूज वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व माजी सरपंच तुकारामभाऊ देशमुख, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख, श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, युवा उद्योजक सचिन वावरे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, नगरसेवक सुरेशआबा वाघमोडे, मारुती खुसपे, सचिन टेळे, योगेश देशमुख, टी. डी. देशमुख, सचिन माने, सुनील वाघमोडे व इतर मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
वाढदिवसाचे औचित्य साधून अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तू व साहित्य वाटप करून समाज उपयोगी सामाजिक कार्याने वाढदिवस साजरा केलेला असल्याने अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दरवळत होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व देशमुख परिवार व मित्रपरिवार उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
