युवा कीर्तनकार गायनाचार्य ह.भ.प. हरिश्चंद्र महाराज जराट यांचे सुश्राव्य किर्तन.

आसरा हॉटेलचे मालक स्वर्गीय मधुकर सातपुते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसाद आयोजन.

खुडूस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील पानीव पाटी येथील आसरा हॉटेलचे मालक स्वर्गीय मधुकरआप्पा सातपुते यांचे प्रथम पुण्यस्मरण शुक्रवार दि. १०/१२/२०२१ रोजी असून या दिवशी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये युवा कीर्तनकार गायनाचार्य ह.भ.प. हरिश्चंद्र महाराज जराड यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.
स्वर्गीय मधुकर सातपुते यांचे गतवर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालेले होते. आसरा हॉटेल या ठिकाणी त्यांचा नेहमी वावर होता. हॉटेल व्यवसायामुळे त्यांच्याशी अनेक लोकांचा परिचय होता. त्यांचा मनमिळावू व नेहमी हसतमुख आणि बोलका स्वभाव यामुळे हॉटेलात येणारे सर्व ग्राहक यांच्याशी त्यांची जवळीकता होती. माळशिरस व खुडूस दरम्यान पानीव पाटी येथे आसरा हॉटेल आहे. या हॉटेलचे आनंदराव, मधुकर व दादासाहेब हे तीन बंधू एकत्र व्यवसाय करत शेती पहात होते. त्यापैकी मधुकर यांचे अकाली दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमास मित्र परिवार, नातेवाईक यांनी उपस्थित राहून किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसाद घेण्याकरिता यावे, असे आवाहन सातपुते परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा देण्याची भाजपची मागणी
Next articleमाळशिरस नगरपंचायत निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी आमने सामने दोन वार्डात सरळ सरळ लढत होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here