संग्रामनगरच्या माजी सरपंच सौ. राजवर्धीनी माने पाटील यांच्या उपस्थितीत अमरसिंह माने देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षतुला कार्यक्रम
वेळापूर ( बारामती झटका )
संग्रामनगरचे माजी उपसरपंच युवानेते श्रीराज नंदकुमार माने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. 24/05/2022 रोजी सायंकाळी 6 वा. वेळापूर येथील प्रगतशील बागायतदार अर्धनारीनटेश्वर यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष युवा उद्योजक उमेशशेठ भाकरे मित्र परिवाराच्यावतीने श्रीराज माने पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षतुला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सदरच्या कार्यक्रमास संग्रामनगरच्या माजी सरपंच सौ. राजवर्धीनी श्रीराज माने पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. सदरचा कार्यक्रम वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
श्रीराज माने पाटील यांची वृक्षतुला करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर भाविकांच्या सोयीसाठी पुणे-पंढरपूर रोडवर पालखीचा धावा असतो. त्याच्या पाठीमागे वृक्षतुला करून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे. उमेशशेठ भाकरे यांच्या फार्महाऊसवर वाढदिवसानिमित्त केक व सत्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

यावेळी वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये दैदीप्यमान विजय संपादन करून निवडून आलेले सर्व संचालक मंडळ व बिनविरोध चेअरमन अमरसिंह माने देशमुख व व्हाईस चेअरमन महादेव भाऊ ताटे यांचाही सन्मान संपन्न होणार आहे. तरी कार्यक्रमास आमंत्रित लोकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे संयोजक युवा उद्योजक उमेशशेठ भाकरे यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng