श्री. संभाजी जाधव यांचे चि. सागर आणि श्री. सुखदेव राऊत यांची कन्या चि.सौ.कां. सोनाली यांचा शुभविवाह थाटात संपन्न
दहीगाव (बारामती झटका)
संभाजी तुकाराम जाधव रा. चव्हाणवस्ती, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे चि. सागर आणि सुखदेव नामदेव राऊत रा. झिंजेवस्ती, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांची कन्या सोनाली यांचा शुभविवाह बुधवार दि. ४ मे २०२२ रोजी थाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास युवा नेते सौरभ जाधव यांच्या विनंतीस मान देऊन माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते साहेब वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. यावेळी वधु-वरांना शुभाशीर्वाद देवून वैवाहिक जीवनास शुभेच्छा दिल्या.

यावेळी माळशिरस पंचायत समिती माजी उपसभापती किशोर भैय्यासाहेब सुळ, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पै.उमेश भैय्या सूळ, नातेपुते नगरीचे नगरसेवक माजी सरपंच ॲड. बी. वाय. राऊत साहेब, बांधकाम क्षेत्रातील राऊत कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा इंजिनियर श्री. संतोष राऊत साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

त्याचबरोबर या लग्न सोहळ्यास ग्रामपंचायत सदस्य, सर्व माता भगिनी, पैलवान, युवा नेते व सर्व मित्र परिवार यांनी आपली उपस्थिती दर्शवली. सदर विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकीकरण म्हणजे काय असतं हे फक्त जय हनुमान तरुण मंडळ संगमनगर दहिगाव-मोराेची सर्व मित्र परिवार येथुन समजलं जातं.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
