माळीनगर (बारामती झटका)
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएसी) च्यावतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत शिंदेवाडी (ता. माळशिरस) येथील शुभम पांडुरंग जाधव याने उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल सासवड माळी साखर कारखान्याचे वतीने कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांनी सत्कार केला.
शिंदेवाडी (माळशिरस) येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शुभम जाधव याने देशात ४४५ वे स्थान मिळवले आहे. शुभमने प्राथमिक शिक्षण शिंदेवाडी येथे जि.प. शाळेत पूर्ण केल्यावर माध्यमिक शिक्षण माळीनगर येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या मॉडेल विविधांगी प्रशाला व ज्यु कॉलेज येथे पूर्ण केले होते. यानंतर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथे बी. ए. इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतल्यानंतर ज्ञानप्रबोधिनी व युनिक क्लासेसमधून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. अधिकारी होण्याची जिद्द मनात ठेवत शुभमने अभ्यास सुरू केला. सलग चारवेळा मुलाखतीपर्यंत जावूनही त्याची निवड झाली नाही. यावेळी मात्र त्याने देशात ४४५ वे स्थान पटकावत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. शुभम हा इतर मागास प्रवर्गमधून येत असल्याने त्याला IPS मिळण्याची शक्यता आहे. तरीही पुढच्या वर्षी अजून जोमाने तयारी करून IAS होण्याची शुभम याची जिद्द आहे.

शुभमने मिळवलेल्या या यशाबद्दल माळीनगर साखर करखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे यांनी शुभम जाधव याचा फेटा बांधून व हार घालून सत्कार केला आणि पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी प्राचार्य मुरलीधर राऊत, शुभमचे वडील पांडुरंग जाधव, उपप्राचार्य प्रकाश चवरे, कलाध्यापक संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिक्षक कल्याण कापरे, मानसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng