माळशिरस तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक पदावर काम केलेले राणू ओवाळ यांचे पुण्यस्मरण.
येळीव ( बारामती झटका )
येळीव ता. माळशिरस येथील बुद्धवासी राणू सोपान ओवाळ यांचे प्रथम पुण्यस्मरण शनिवार दि. 23/4/2022 रोजी 10 ते 12 या वेळेमध्ये येळीव, काळा मारुती मंदिराजवळ होणार आहे, तरी मित्र परिवार नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे ओवाळ परिवारांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

बुद्धवासी राणू ओवाळ यांनी माळशिरस तालुका कृषी कार्यालय येथे कृषी सहाय्यक पदावर काम केलेले आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव व सहकार्य करण्याची भावना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन यामुळे माळशिरस तालुक्यात सर्वपरिचित असणारे कृषी सहाय्यक होते. त्यांची बदली सांगोला तालुका कृषी कार्यालयात झालेली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोणाची लागण झालेली होती. कोरोना संसर्ग रोगामुळे राणू ओवाळ यांचा दुर्दैवी अंत झालेला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे. बघता बघता वर्ष पूर्ण होत आलेले आहे. त्यानिमित्त प्रथम वर्ष श्राद्ध ओवाळ परिवार यांनी आयोजित केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng