रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान – पोलीस उपअधीक्षक श्री. बसवराज शिवपुजे

अकलूज ( बारामती झटका )

रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. त्यामुळे अनेकांचे जीव वाचतात, असे प्रतिपादन अकलूज विभागीय पोलिस अधिकारी श्री. बसवराज शिवपुजे यांनी केले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक सद्गुरू श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज नगरपरिषद, अकलूज पोलिस स्टेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग परीवार अकलूज यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीरात ते बोलत होते. या रक्तदान शिबीरात ४५ साधकांनी रक्तदान केले.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, निवृत्त पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे, आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम माळशिरसचे संचालक सत्यवान पराडे (सुर्यवंशी), श्री श्री कुस्ती केंद्राचे महादेव ठवरे, शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँकेचे डॉ. बाहुबली दोशी, डॉ. संतोष खडतरे, आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक बाळासाहेब बिचकुले, कृषी अधिकारी उदय साळुंखे, डॉ. वसुंधरा देवडीकर, छाया बु-हाडे आदी उपस्थित होते. यावेळी सत्यपाल ताम्हाणे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. धनंजय देशमुख यांनी केले तर आभार माऊली मुंडफणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगशिक्षक हरीभाऊ माने, राजीव बनकर, विक्रम भोसले, विजय मिसाळ, गोरख डांगे, पोलिस कर्मचारी शिवकुमार मदभावे, विद्या गिरमे, जयश्री जगताप, सुजाता अनपट, रेखा नेवसे यांनी सहकार्य केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगुरसाळे सेवा सोसायटीवर भाजपचे गुलाब गायकवाड चेअरमन, तर राष्ट्रवादीचे दीपक कोरटकर यांची व्हाईस चेअरमन पदी निवड.
Next article‘माझं डोळे झाकण्याआधी उपअधीक्षक भूमी अधिकारी यांचे डोळे उघडावे’, श्रीमती पार्वती भोसले यांची प्रशासनाला आर्त हाक…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here