वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर, ता. माळशिरस येथील तरुण पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते ओंकार दत्तात्रय आडत यांनी रजिस्टर पद्धतीने विवाह करीत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. लग्नात होणारा अवाढव्य खर्च टाळून साधेपणाने विवाह सोहळा संपन्न केला आहे.
दि. १५ डिसेंम्बर रोजी सोलापूर येथे ओंकार आडत व वृषाली बनकर यांचा सर्वांच्या सहमतीने रजिस्टर पद्धतीने हा विवाह संपन्न झाला. त्यानंतर आज ०१ जानेवारी रोजी नाम फाउंडेशन चे संस्थापक, सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेऊन विवाहातून बचत केलेली काही रक्कम नाम फाउंडेशन ला मदत म्हणून देऊ केली.
नाम फाउंडेशन ला जलसंवर्धन व इतर सामाजिक कार्यासाठी मदत म्हणून दिली. नानाजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच पुढील वैवाहिक आयुष्यासाठी नानाजींचे आशीर्वाद घेतले. अशी माहिती या नवदाम्पत्यांनी दिली.

यावेळी नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर, नाम फाउंडेशन चे गणेश थोरात यांच्यासह कटफळ येथे जलसंवर्धन ची चळवळ उभे करणारे महाराष्ट्र पोलीस दत्तात्रय खरात, बिरजू हांडे, मारुती भाऊ पुजारी आदी उपस्थित होते.
चौकट –
या भेटीदरम्यान नाम च्या कामाला पत्रकार ओंकार आडत यांनी दिलेली प्रसिद्धी व कार्य अहवाल पाहून तसेच विवाहाचा खर्च सामाजिक कार्यास देत असताना अभिनेते नाना पाटेकर यांनी ओंकार आडत यांना मिठी मारली. तसेच त्यांची पत्नी वृषाली हिस आपुलकीने विचारपूस केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng