रणजीतसिंह मोहिते पाटील झेरॉक्स आमदार अशी प्रतिमा निरा देवधर लाभक्षेत्रात येणाऱ्या 22 गावांमध्ये झालेली आहे.

कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी माढा लोकसभेचे पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या निवेदनाची घेतली दखल.

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या निवेदनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये नीरा-देवधर व फलटण-पंढरपूर रेल्वे यासह अनेक विकासकामांना भरघोस निधी दिलेला आहे. दोन्ही लोकप्रतिनिधी यांनी प्रलंबित विकासकामांचा पाठपुरावा करून वेळोवेळी सोशल मीडियावरून माळशिरस तालुक्यातील निरा देवधर प्रकल्पातील वंचित असणारे २२ गावांनी पाहिलेले आहे. मात्र कॅबिनेट मंत्रिमंडळात निधीची तरतूद झाल्यानंतर विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दि. 27/ 9/2022 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना पत्र दिले असल्याचे सोशल मीडियावर फिरत आहेत. मात्र, सदरच्या पत्रावर उपमुख्यमंत्री यांचा शेरा अथवा उपमुख्यमंत्री कार्यालयाचा साधा शिका सुद्धा नाही. त्यामुळे रणजीतसिंह मोहिते पाटील झेरॉक्स आमदार आहेत, अशी माळशिरस तालुक्यातील 22 गावांमधील शेतकऱ्यांमधून संतप्त व तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील जलसिंचन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या गावांना लाभ मिळावा व जलसिंचन प्रकल्पास संमती मिळावी व फलटण-पंढरपूर रेल्वे लाईन कामे व इतर योजना संदर्भात आपल्या अध्यक्षतेखाली सचिव, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक मंत्रालयीन कक्षात लावण्यासाठी देवेंद्रजी यांच्याकडे पत्र दिलेले होते. त्यामध्ये निरा-देवधर प्रकल्पास मान्यता देऊन उर्वरित कामास आर्थिक तरतूद देऊन कामे सुरू करणे याबाबत आदेश होने कामी व उर्वरित निधीबाबत आपणाकडून शिफारस प्रस्ताव केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयास पाठवण्यात यावेत व याचबरोबर बंदिस्त पाईपलाईनद्वारे उर्वरित कामांचे नियोजन असल्याने बाष्पीभवन होऊन जात होते ते वाचणारे पाणी फेरवाटप करून नीरा-देवधर लाभक्षेत्रात येणाऱ्या माळशिरस तालुक्यातील दुष्काळी 22 गावात लाभ मिळावा (आमदार राम सातपुते यांनी दिलेले पत्र सोबत देत आहे.). फलटण-पंढरपूर रेल्वे DPR ला मान्यता देऊन आवश्यक असणाऱ्या तथा लागणाऱ्या 50% निधीची तरतूद राज्य शासनाकडून करणे बाबत, असे 15 मुद्दे माढा लोकसभा मतदार संघातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे व विकासाच्या दृष्टीने दळणवळणाच्या प्रश्नाला अनुसरून देवेंद्रजी यांच्याकडे विनंती करण्यात आलेली होती.

त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विषयाच्या अनुषंगाने दि. 31/01/2023 रोजी सकाळी 10 वाजता, सातवा मजला समिती कक्ष क्रमांक 05 मंत्रालय मुंबई येथे माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन व इतर प्रकल्पासंदर्भात बैठक आयोजित केलेली होती. सदरच्या बैठकीस माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, भाजपचे सोलापूर जिल्हाचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य के. के. पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा निरा देवधर संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, भाजपचे सोशल मीडिया प्रमुख प्रमोद काळे, बारामती झटका न्यूज चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील लोकप्रतिनिधी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदरच्या बैठकीत अप्पर मुख्य सचिव वित्त, अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम, अप्पर मुख्य सचिव जलसंपदा, प्रधान सचिव विधी व न्याय, प्रधान सचिव नियोजन, प्रधान सचिव ऊर्जा, प्रधान सचिव नगर विकास, प्रधान सचिव उद्योग, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई आदी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी दि. 01/08/2022 रोजी समक्ष भेट घेऊन पत्र देऊन चर्चा केलेली होती. माळशिरस मतदार संघात निरा देवधर केनॉल कामासाठी निधी मंजूर करावा, अशी विनंती केलेली होती. हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुद्धा अधिवेशनात नीरा देवधर चा प्रश्न मांडलेला होता. माढा लोकसभेचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेतील बैठक व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा पत्राद्वारे व अधिवेशनात प्रश्न मांडून केलेला पाठपुरावा, यामुळे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार राम सातपुते यांच्या पाठपुराव्याची व पत्राची झेरॉक्स रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी करून कॅबिनेट मंत्रिमंडळात सदरच्या प्रकल्पास भरीव निधी मंजूर झाल्यानंतर सोशल मीडियावर कार्यकर्त्यांच्या मार्फत श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न केलेला असल्याने माळशिरस तालुक्याच्या बावीस गावातील शेतकरी वर्गामधून रणजीतसिंह मोहिते पाटील यांची झेरॉक्स आमदार अशी प्रतिमा असून सर्वसामान्य व शेतकरी यांच्या संतप्त व खेदजनक प्रतिक्रिया सुरू आहेत.

निरा-देवधर प्रकल्पाचे माळशिरस तालुक्यात पाणी यावे, यासाठी बाळासाहेब सरगर व शिवराज पुकळे यांनी सातत्याने आंदोलने, निवेदने देऊन पाठपुरावा केला. तसेच फलटण-लोणंद रेल्वेसाठी ॲड. सोमनाथ वाघमोडे व भानुदास सालगुडे पाटील यांनी वेळोवेळी संबंधित लोकप्रतिनिधी यांच्याशी भेटीगाठी घेऊन चर्चा करून निवेदने दिलेली होती. त्यामुळे निरा-देवधर संघर्ष समिती व फलटण-पंढरपूर संघर्ष समिती मधील सर्व तरुण कार्यकर्ते यांच्यावर माळशिरस तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleTotally free VPN To get Android – What to Look For in a VPN
Next articleवेळापूर तंटामुक्त समिती अध्यक्षपदी युवराज मंडले तर उपाध्यक्षपदी सौ. अश्विनी भानवसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here