रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी कारखाना सुरू करतो म्हणाले सुरू केला, थकित बिल देतो म्हणाले बिल देणे गरजेचे आहे

सदाशिवनगर श्री शंकर सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी, कामगार, ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील ऊस उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्या जिव्हाळ्याचा व आर्थिक स्तोत्र निर्माण करणारा सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखाना अनेक वर्ष बंद अवस्थेत होता. सदर कारखान्याची निवडणूक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढविली होती. त्यावेळेस विधान परिषदेचे आमदार मोहिते-पाटील यांनी निवडणुकीत व निवडणुकी नंतर कारखाना सुरू करतो म्हणल्याप्रमाणे सुरू केला. थकित बिल देतो म्हणाले होते मात्र, बिल देणे बाकी असल्याने ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी व कामगार यांच्यामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यासाठी बिल व कामगारांचे पगार देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विकासरत्न विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यावर ऊस उत्पादक, शेतकरी व सभासद कामगार यांनी विश्वास ठेवून पॅनलला मतदान दिलेले होते. सर्वच्या सर्व उमेदवार विजयदादा यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेले होते. निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी कारखाना सुरू करून सभासद व कामगार यांची देणी देण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे, कारखाना विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अनंत आर्थिक अडचणीतून अथक परिश्रमाने सुरू केला.

यंदाच्या वर्षी साडेतीन लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कारखाना सुरू झाल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी, कामगार यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील कारखाना सुरू झाल्यामुळे आर्थिक चक्र फिरलेले आहे. कारखान्याच्या पूर्वीच्या प्रशासन व संचालक मंडळ यांचेकडून ऊस उत्पादक सभासदांचे ऊस बिलाचे पैसे थकलेले होते. सदरचे बिलाचे पैसे निवडणुकीत सभासदांना थकीत बिले आम्ही देतो, असे सांगितले असल्याने सभासदांच्या बिल मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

कारखाना सुरु झाल्यानंतर 20 टक्के थकीत रक्कम ऊस गाळप करणाऱ्या सभासदांना दिले जाईल, असा कारखाना प्रशासनाचा निर्णय झाल्यानंतर ऊस उत्पादक सभासद यांनी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, जयवंत पालवे यांच्यासह अनेक नेते-कार्यकर्ते, सभासद यांनी कारखाना गेटवर धरणे आंदोलन सुरू केलेले होते. बारा दिवसानंतर कारखाना प्रशासनासह सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन तालुक्याचे नेते जयसिंह मोहिते पाटील, विद्यमान चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, कारखान्यावर नियंत्रण असणारे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यासह आजी माजी संचालक यांनी उपोषणस्थळी येऊन आंदोलकांच्या मागण्या मान्य केलेल्या होत्या. त्यामध्ये शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस गाळपाला आणू अथवा न आणू 20 टक्के रक्कम देण्याचे कबूल केले होते. सहकार महर्षी साखर कारखाना जो दर देईल तोच श्री शंकर सहकारी साखर कारखाना दर देईल असा निर्णय कारखाना सुरू होण्यापूर्वी जाहीर बैठकीमध्ये केलेला होता.

सध्या काही सभासद व शेतकरी लोकांना 20 टक्के रक्कम मिळालेले आहे, तर काहींना मिळालेली नाही. यंदाच्या वर्षी 1900 रुपये दर दिलेला आहे. सहकार महर्षीप्रमाणे दर धरला तर सभासदांचे शंभर रुपये सभासदांचे राहत आहेत.
आंदोलन कर्ते व कारखान्याचे सभासद मधुकर पाटील यांनी 20 टक्के थकित वेतन व उर्वरित शंभर रुपये द्यावे यासाठी आवाज उठवलेला होता. त्यावेळी मोहिते पाटील समर्थक यांचेकडून सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया येत होत्या. त्यामुळे सोशल मीडियावर राजकीय कलगीतुरा रंगलेले होते.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिकूल परिस्थितीत अनंत अडचणीतून कारखाना सुरु केलेला आहे. याबद्दल स्थानिक नागरिक, व्यापारी, कामगार व ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र, ठरल्याप्रमाणे निवडणुकीतील व कारखाना सुरू होण्यापूर्वी थकित ऊस बिलाचा प्रश्न मार्गी लावावा, असा सूर सभासदांमधून उमटत आहे.

मोहिते पाटील समर्थक मोहिते पाटील यांना समोरासमोर काही बोलत नाहीत. मात्र, विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर छुपा पाठिंबा देत असतात. कारण विरोधकांनी उठवलेल्या आवाजाचा त्यांनाही फायदा होत असतो. त्यामुळे मोहिते पाटलांच्या सच्चा कार्यकर्त्यांमधून बोलले जाते आहे की, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अनंत अडचणीतून कारखाना सुरु करून मोठ्या हत्ती घालवलेला आहे. उस बिलाच्या शेपटासाठी अडचण येत असेल तर काहीतरी मार्ग काढून थकीत बिल सभासदांची द्यावे. कारखाना सुरू करणे एवढा मोठ्या हत्तीची अडचण घालवली आणि किरकोळ उस बिलाच्या शेपटासाठी अडचण येत असेल तर लवकर सोडवावी. पुढच्या वर्षी सात लाखापर्यंत कारखाना चालवून विरोधकांच्या नाकावर टिच्चून माळशिरस तालुक्यात व कारखाना परिसरात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व विकासरत्न विजयसिंह मोहिते पाटील यांनी आदर्श घालून दिलेले जनहिताचे कार्य करावे, असे मोहिते पाटील समर्थक यांच्यामधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleएकशिव सेवा सोसायटीच्या निवडणुकीत सरपंच शहाजीदादा धायगुडे यांच्या सहकार पॅनलची कडवी झुज.
Next articleएस्. एम्. हायस्कूलच्या १९७६ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here