रण-धैर्य माढा लोकसभेचे उमेदवार नव्हे तर उमेदवार प्रतिनिधी तरी बनतील का ?

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश संयोजन (निवडणूक इन्चार्ज) श्रीकांतजी भारतीय यांच्या दौऱ्याकडे डोळेझाक…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठीसह सर्वसामान्य जनता समाधानी..

माळशिरस ( बारामती झटका )

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे तत्कालीन विशेष कार्यकारी अधिकारी असणारे विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय यांची नाशिक येथे झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये प्रदेश संयोजन पदी निवड केल्यानंतर प्रथमच श्री पांडुरंग रुक्मिणी मंदिरामध्ये महासंकल्पाचा शुभारंभ करण्यासाठी माळशिरस तालुक्यातून गेलेले होते. त्यावेळेस अकलूजवरून येऊनसुद्धा मोहिते पाटील आणि मोहिते पाटील समर्थक यांनी त्यांना साधा हार व पुष्पगुच्छ सुद्धा दिलेला नाही. पक्ष नेतृत्वाकडे डोळे झाक करणारे रण-धैर्य माढा लोकसभेचे खासदार होण्याचे स्वप्न पहात आहेत. त्यामुळे माढा लोकसभेचे उमेदवार नव्हे तर उमेदवाराचे प्रतिनिधी तरी बनतील का ? असा राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे.

माढा लोकसभेचे कार्यतत्पर जलनायक रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदार संघात अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडून शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये अनेक दिवसांपासून असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करून सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आपलेपणा निर्माण केलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्तीपेक्षा पक्ष निष्ठेला महत्त्व असते. पक्षाची ध्येय धोरणे इतर पक्षापेक्षा वेगळी आहेत. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्षनिष्ठेबरोबर सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना सोडवून समाजामध्ये यशस्वी खासदार असा नावलौकिक मिळविलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघात तालुक्याच्या विकासाला वेगळी दिशा देणारा फलटण पंढरपूर रेल्वेचा प्रश्न माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा निरा देवधर प्रकल्प यासह सांगोला माढा करमाळा पंढरपूर मतदार संघातील पाण्याचे व रस्त्याचे प्रश्न सोडविलेले आहेत. फलटण विधानसभा मतदारसंघांमध्ये फलटणच्या जनतेच्या मनामधील एमआयडीसीचा प्रश्न सोडवलेला आहे, अशी अनेक विकासात्मक कामे करून माढा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात नव्हे तर देशात चर्चेत होता. अशा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह केंद्रीय मंत्री त्याचबरोबर महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री यांच्याकडून मतदार संघामध्ये सकारात्मक कामे करून भारतीय जनता पक्षाचे पक्षीय मनोबल वाढवलेले आहे. मतदार संघातील सर्वसामान्य जनता व शेतकरी समाधानी आहेत. अशामध्येच रण-धैर्य माढा लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वयंघोषित कार्यकर्त्यांकडून केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मात्र पक्षवाढीसाठी ठोस असे योगदान नाही. पक्षश्रेष्ठींशी सलोख्याचे संबंध नाहीत. मनामध्ये मनसुबा मात्र मोठा आहे. कदाचित भाजप विरहित असू शकतो का ?, असाही प्रश्न माढा मतदार संघात चवीने चर्चिला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत भविष्य घडवण्यासाठी नातेपुते येथे एस.एन.डी करिअर अकॅडमीचे उद्घाटन
Next articleनायगावचे आदर्श सरपंच जितेंद्र पांडुरंग चौधरी यांचा डॉ. दीपक शिकारपूर यांच्याहस्ते सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here