मांडवे (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेमध्ये रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर संचलित, रत्नत्रय कनिष्ठ महाविद्यालय मांडवेचा निकाल सलग चौथ्यांदा 100% लागला. इंग्रजी माध्यमामध्ये कु. स्नेहा नानासो नारनवर – 92.80.% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर कु. निकिता ज्ञानदेव नाळे या विद्यार्थिनीने 91.20% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे, तर रिया मनोज दोशी या विद्यार्थिनीने 91% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

सेमी विभागात कु. रेणुका शत्रुघ्न मोहिते – 91.40.% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर कु. प्रतीक्षा रामचंद्र शेंडगे, साक्षी विजय पालवे, मोहिनी बाळू काळे या विद्यार्थिनींनी 91.00% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे, तर कु. नम्रता गणेश मोरे या विद्यार्थिनीने 90% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

आमदार रामभाऊ सातपुते यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. कोरोना कालखंडानंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवीत यशाचे शिखर गाठले आहे व रत्नत्रय ही एक माळशिरस तालुक्यातील पश्चीम भागातील एक अग्रगण्य संस्था असल्याचे दाखवून दिले. विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या क्षेत्राचा विचार करून शिक्षण क्रमाची निवड करण्याचे आव्हान केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन माळशिरसचे आमदार राम सातपुते, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनंतलाल दोशी, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन श्री. विरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री. प्रमोद दोशी, मिहिर गांधी, डॉ. सतिश दोशी, डॉ. संतोष दोशी अकलूज, नितीन दोशी म्हसवड, सुजाता शहा पुणे, देविदास ढोपे, सुनिता दोशी माढा, प्रणिता दोशी फलटण, विशाल गांधी फलटण, बाहुबली दोशी, वर्धमान दोशी, निश्चल व्होरा, शंशील गांधी, महावीर शहा, जितेश मरवडेकर पंढरपूर, राजेश दोशी माढा, डॉ. विजयसिंह भगत, विजय गांधी करमाळा, वैभव दोभाडा, रामदास कर्णे, अभिजित दोशी, निलेश पेनुरकर, तुषार गांधी, संतोष गुरव, रविंद्र कुलकर्णी, वैभव शहा, ज्ञानेश राऊत, सुरेश धाईजे, संदीप नरोळे, रामदास गोफणे, दत्ता भोसले, चंद्रकात तोरणे, डॉ. पराग किसवे, समीर देशपांडे, सागर उरवणे, दिनेश पोरे, विवेक भंडारे विटा इ. तसेच संस्थेतील प्राचार्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng