रत्नत्रय पतसंस्थेचा १८ वा वर्धापन दिन व महिला दिन उत्साहात साजरा

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर ता. माळशिरस येथील रत्नत्रय पतसंस्थेचा १८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तसेच जागतिक महिला दिन हि साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक मा.श्री.अनंतलाल दादा दोशी यांचे उपस्थित संपन्न झाला. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री.विरकुमार (भैया) दोशी, व्हाईस चेअरमन संजय गांधी, संचालक प्रमोद (भैय्या) दोशी, अजय गांधी, बबण गोपने, बाहुबली दोशी, अजितकुमार दोशी, मेडद गावचे उपसरपंच श्री. शिवाजी लवटे, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास कर्णे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ भोसले, रत्नत्रय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अमित पाटील व दैवत वाघमोडे तसेच संस्थेचे सभासद संतोष गुरव, सुभाष सुदने, चंद्रकांत तोरणे, शहाजी देशमुख, मोहिद्दिन पठाण, सुदाम ढगे, सागर दोशी, पत्रकार श्रीनिवास कदम पाटील, विष्णू भोंगळे सर, समाधान मिसाळ व बंडू पालवे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी अध्यक्षीय भाषणात दादांनी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देवून पुढे म्हणाले कि, आता महिलादेखील पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करीत असून चूल आणि मूल यातून बाहेर आल्या आहेत. मुलगा, मुलगी भेदभाव कमी झाला असून त्यांनाही पालकवर्ग चांगले शिक्षण देत आहे. प्रत्येक क्षेत्रात व शिक्षणातही महिलाच आघाडीवर आहेत. पतसंस्था चालवणे हे खूपच कठीण काम असून सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपल्या संस्थेने १८ वर्षे पूर्ण केली आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद भैय्या दोशी यांनी केले. त्यांनी संस्था करीत असलेल्या कामाबरोबर सामाजिक कामाचा देखील आढावा घेतला. संस्था १८ वर्षाची झाली असून ती आता पूर्ण सुज्ञान झाली आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. इथून पुढे आणखीन चांगल्या प्रकारची सेवा देऊ असे ते म्हणाले. तसेच महिला दिनानिमित्त पतसंस्थेच्या वतीने सौ. नीता रणवरे यांच्या शुभहस्ते सौ. पार्वती जाधव, डॉ. रेश्मा गांधी व जयश्री मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन विरकुमार भैया दोशी यांनी सांगितले की, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे व विश्वासामुळे संस्था चांगल्या प्रकारे चाललेली आहे. संस्था पुढील वर्षी नवीन जागेमध्ये आपला वर्धापन दिन साजरा करेल, यात शंका नाही. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या आरपीआयच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा. श्री. सोमनाथ भोसले यांचाही सत्कार रत्नत्रय उद्योग समूहाचे संस्थापक मा.श्री. अनंतलाल (दादा) दोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. तसेच संस्थेचे सचिव श्री. ज्ञानेश राऊत यांनी संस्थेच्या कार्याचा दि. ८ मार्च २०२२ अखेरचा आढावा घेतला. संस्था स्थापन झाली त्यावेळेस फक्त एक लाख रुपये ठेवी होत्या. आज अठरा वर्षात संस्थेकडे १७ कोटी ७५ लाख ६९ हजार ४८९ रु. ठेवी जमा आहेत व कर्ज वाटप १५ कोटी ६९ लाख ८८ हजार ९८२ रु. एवढे कर्जवाटप झाले आहे. संस्थेचे भाग भांडवल ४२ लाख ७५ हजार रुपये आहे. तसेच संस्थेचे वसुली ही पिग्मीच्या माध्यमातून असल्यामुळे चांगल्या प्रकारची आहे. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार श्रीनिवास कदम पाटील यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमनसेच्या वर्धापन दिन व महिला दिनानिमित्त १५१ जणांचे रक्तदान..
Next articleGames For most Several fifa 18 release date years Coming from Zoom

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here