सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर येथील रत्नत्रय पतसंस्था यांची सन 2020/21 ची 17 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच ऑनलाईन पद्धतीने पार पडली यावेळी संस्थेचे संस्थापक मा. श्री.आनंतलाल दोशी (दादा) चेअरमन मा. श्री.विरकुमार दोशी व्हाईस चेअरमन संजय गांधी संचालक प्रमोद दोशी,जगदीश राजमाने,अजय गांधी ,रामदास गोपने, सौ अनिता दोशी व सचिव ज्ञानेश राऊत यांचे सह सभासद ऑनलाईन उपस्थित होते. प्रस्ताविक कात बोलताना पतसंस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक मा. श्री.प्रमोद दोशी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व संस्था देत असलेल्या सेवांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला संस्थेमार्फत व्यापाऱ्यांसाठी कमी पैशात भारतात कुठेही आरटीजीएस व एन एफ टी सेवा पुरवली जात आहे डीडी काढण्याची सुविधा लाईट बिल फोन बिल भरणे सुविधा अशा सर्व वाहनांचे इन्शुरन्स काढणे ऑनलाईन टीडीएस भरणे पॅन कार्ड काढणे आशा विविध सुविधा चालू केलेल्या आहेत तरी सर्व सभासदांनी याचा लाभ घ्यावा असे यावेळी त्यांनी सांगितले पुढे बोलताना आनंतलाल दोशी म्हणाले की पतसंस्थेची स्थापना छोट्या व्यावसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे त्यांच्या उन्नती व्हावी या उद्देशाने करण्यात आले असून या संस्थेची प्रगती सर्व सभासद ठेवीदार संचालक व कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग असून पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देत आहे आर्थिक व्यवहार याबरोबर ही संस्था अनेक सामाजिक कार्यही करीत आहे यावर्षी सर्व सभासदांना 13 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.

तसेच चेअरमन मा. श्री. विरकुमार (भैय्या) दोशी यांनी अहवाल वाचन करून पतसंस्थेत 31 मार्च 2021 अखेर 15 कोटी 78 लाख 81 हजार 165 रुपये ठेवी असून कर्जवाटप 12 कोटी 43 लाख 79 हजार 620 झाले आहे तसेच संस्थेचे गुंतवणूक 6 कोटी 87 लाख 71 हजार 998 रुपये आहे संस्थेचे एकूण वसूल भागभांडवल 44 लाख 43 हजार 800 रुपये आहे तसेच संस्थेचे एकूण उत्पन्न 1 कोटी 77 लाख 67 हजार 715 रुपये असून एकूण खर्च 1 कोटी 56 लाख 11 हजार 996 रुपये झाला असून संस्थेस चालू आर्थिक वर्षात 21 लाख 55 हजार 719 रुपये निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .

संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश राऊत यांनी सभे पुढील विषय वाचन करून संस्थेच्या आर्थिक पत्रकाची माहिती त्यांनी यावेळी दिली व आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक जगदीश राजमाने यांनी मानले यावेळी संस्थेचे सर्व कर्मचारी पिग्मी एजंट उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng