रत्नत्रय पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद – आमदार राम सातपुते

मांडवे (बारामती झटका)

रत्नत्रय पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. पतसंस्थेने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध कामांवर भर दिला आहे. त्यामुळे ही पतसंस्था आदर्श पतसंस्था ठरेल, असे प्रतिपादन माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी केले.

मांडवे येथील रत्नत्रय इंग्लिश स्कूल या ठिकाणी आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते रत्नत्रय दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी त्यांनी रत्नत्रय पत संस्थेच्या कार्याचा गौरव करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी रत्नत्रय पतसंस्थेचे संस्थापक अनंतलाल (दादा) दोशी, रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी, रत्नत्रय इंग्लिश स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी, भाजपा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, पुरंदावडे गावचे उपसरपंच संतोष शिंदे, धर्मवीर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रशांत दोशी, तसेच रत्नत्रय पतसंस्थेचे संचालक अजय गांधी, जगदीश राजमाने, रामदास गोफणे, बाहुबली दोशी, तुषार गांधी व सचिव ज्ञानेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला.


यावेळी अनंतलाल दोशी म्हणाले की, संस्था ऑनलाइन व्यवहार करीत आहे. संस्थेमार्फत सभासदांना डिडी काढणे, आरटीजीएस, एनईएफटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, लाईट बिल भरणे, एटीएमच्या माध्यमातून पैसे काढणे, अशा विविध सुविधा संस्थेमार्फत सभासदांना पुरवल्या असल्यामुळे व्यवहार सुरळीत चालू आहेत. आर्थिक व्यवहाराबरोबरच ही संस्था अनेक सामाजिक कार्य करून समाजसेवा करीत आहे. गेली १७ वर्ष रत्नत्रय पतसंस्था ही दरवर्षी दिनदर्शिका काढत असते. तसेच सर्व जाहिरातदारांचे सहकार्य असते, असेच प्रेम संस्थेवर राहावे त्याबद्दल सर्व जाहिरातदारांचे आभार संस्थापक अनंतलाल दोशी यांनी मानले व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दिनांक ३१/०३/२०२१ अखेर संस्थेकडे १५ कोटी ७८ लाख ८१ हजार रुपये इतक्या ठेवी संस्थेकडे असून कर्ज वाटप १२ कोटी ४३ लाख ७९ हजार रुपये इतकी आहे. संस्थेचे भाग भांडवल ४४ लाख ४३ हजार ८०० रुपये असून गुंतवणूक ६ कोटी ८७ लाख ७१ हजार रुपये इतकी आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल १११ कोटी ९ लाख २६ हजार रुपये असून सर्व खर्च वजा जाता संस्थेला २१ लाख ५५ हजार ७१९ रुपये नफा झालेला आहे. संस्थेला स्थापनेपासून दरवर्षी ऑडिट वर्ग “अ” आहे व संस्था दरवर्षी सभासदांना १५% लाभांश वाटप करत असते आणि हे सर्व संस्थेच्या पारदर्शी कारभारामुळे शक्य झाले आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत यांनी दिली. यावेळी आभार प्रदर्शन संस्थेचे चेअरमन विरकुमार (भैय्या) दोशी यांनी केले.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशहाजीनगरमध्ये दत्त नामाच्या गजरात भाविक चिंब, हजारो भाविकांच्या उपस्थितीत दत्तजन्म सोहळा संपन्न
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसची महाळूंग- श्रीपुर नगरपंचायतीच्या निवडणुकीचे ‘एकच फाईट, वातावरण टाईट’ असं नियोजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here