सदाशिवनगर (बारामती झटका)
सदाशिवनगर व परिसरात नावाजलेली पतसंस्था म्हणजे रत्नत्रय पतसंस्था त्या संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश राऊत यांनी वाढदिवस साजरा न करता ती रक्कम शाळेच्या ज्ञानदान साठी संस्थेचे संस्थापक माननीय श्री अनंतलाल दादा दोशी यांच्याकडे 11,111/- रुपयाचा चेक सुपूर्द केला यावेळी रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री.विरकुमार (भैया) दोशी मुख्याध्यापक श्री पाटील सर व सर्व शिक्षक उपस्थित होते.

चालू वर्षांमध्ये करुणा चे संकट आणि दुसऱ्या लाटेमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये व पै पाहुण्यांमध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे व कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झालेले आहे आणि त्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी राऊत साहेब यांनी या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले व त्याचा खर्च त्यांनी ज्ञानदान साठी केला व रत्नत्रय विद्यालयातील सर्व मुलांना बिस्किट वाटप करण्यात आले. असेच सत्कर्म व समाजोपयोगी काम राऊत साहेब आपल्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व आपणाला बारामती झटका परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng