रत्नत्रय पतसंस्थेच्या चेअरमन पदी विरकुमार दोशी व व्हा. चेअरमनपदी डॉ. निवास गांधी यांची निवड

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर येथील पतसंस्थेच्या सन 2022-23 ते 27-28 या सालाकरता निवडणूक पार पडली. यावेळी विरकुमार अनंतलाल दोशी यांची चेअरमन पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हा. चेअरमन पदी डॉ. निवास शरद गांधी यांची सर्वांमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली. यामधील संस्थेचे संचालक पुढीलप्रमाणे – प्रमोद दोशी, संजय गांधी, अजय गांधी, जगदीश राजमाने, रामदास गोपने, सोमनाथ राऊत, अरुण धाईंजे, अनिता दोशी, अनघा गांधी यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. सदर निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी श्री. जी. बी. जाधव साहेब यांच्या उपस्थितीत रत्नत्रय पतसंस्थेच्या कार्यालयात पार पडला. यावेळी रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अनंतलाल (दादा) दोशी, तज्ञ संचालक सुरेश (काका) कुलकर्णी, चंद्रकांत तोरणे, सचिव ज्ञानेश राऊत व पतसंस्थेचे कर्मचारी व पिग्मी एजंट उपस्थित होते.

यावेळी चेअरमन पदी निवड केल्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे आभार विरकुमार दोशी यांनी मानले. मागील कार्यकाळात जसे संस्थेचे पारदर्शक काम करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. तसेच इथून पुढील कार्यकाळात सहकार्य करण्यासाठी विनंती केली व पुढील कार्यकाळातही आपण संस्था नावारूपाला आणण्याचे काम करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

तसेच व्हा. चेअरमन डॉ. निवास गांधी म्हणाले कि, आपण सर्वांनी मिळून जी माझ्यावर व्हा. चेअरमन पदाची जबाबदारी टाकली आहे, ती मी चांगल्या प्रकारे पार पाडेन. माझ्यावर विश्वास ठेवून माझी व्हा. चेअरमन पदी नियुक्ती केली त्याबद्दल रत्नत्रय परिवाराचा मी आभारी आहे.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव ज्ञानेश राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद दोशी यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर, प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते आणि मुख्य महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर यांच्या उपस्थीतीत संपन्न.
Next articleगर्भाशयाचा कॅन्सर होवू नये म्हणून अकलूजला मोफत लसीकरण – डॉ. सतीश दोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here