सदाशिवनगर (बारामती झटका)
श्री सन्मती सेवा दल व श्री १००८ भगवान महावीर जन्म कल्याणक प्रभावना महोत्सव, पंढरपूर महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नत्रय परिवार सदाशिवनगरचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. अनंतलाल दोशी यांना डॉ. श्री सतीश दोशी, श्री मिहीर गांधी यांच्या शुभहस्ते समाजहित दक्षक ज्ञानदाता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्री. अनिल जमगे अध्यक्ष भारतवर्षीय दिगंबर तीर्थक्षेत्र कमिटी महाराष्ट्र राज्य, श्री. राहुल शहा चेअरमन रतनचंद शहा को-ऑपरेटिव बँक, मंगळवेढा, श्री. आर. के. दोशी चेअरमन महालक्ष्मी मसाला, श्री. सुहास शहा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती प्रशिक्षण केंद्र, कुर्डवाडी, श्री. मिहिर गांधी संस्थापक अध्यक्ष श्री सन्मती सेवा दल, डॉ. राजेश फडे पंढरपूर, श्री. विरकुमार दोशी अध्यक्ष श्री सन्मती सेवा दल आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रांतीअग्रणी, विधायक कृतिशीलता, मातृ-पितृ भक्त, समाजसेवक, धर्मअनुरागी, श्रमदेवतेचे पुजारी, आशावादी व उत्साही सर्वोत्कृष्ट ध्येयाने भारलेले, संकटाकडे सुवर्णसंधी म्हणून तिचा सत्कार्यासाठी वापर करणारे, यशाच्या मागे न पडता यश स्वतःकडे खेचून घेणारे, लौकिक बिझनेस मॅनेजमेंटची पदवी न घेता अनुभवातून आणि कष्टाने एक कुशल व्यवस्थापक म्हणून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारे, स्व. श्री. रतनचंद देवचंद दोशी व स्व. सौ. सुशीला रतनचंद दोशी यांचे सुपुत्र, सदाशिवनगर निवासी, आदरणीय श्री. अनंतलाल रतनचंद दोशी, सदाशिवनगर यांना हा बहुमोल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आदरणीय दादा यांना वेळोवेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. यामध्ये राष्ट्रसेवा पुरस्कार, राजीव गांधी सन्मान पुरस्कार, जैन गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, आदर्श व्यापारी पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
आदरणीय दादा यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलेले आहे.
1) सभापती : – कर्मवीर बाबासाहेब पाटील विद्यालय, सदाशिवनगर .
2) सदस्य : – फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज , महाराष्ट्र – गुजरात प्रोव्हीयन्स .
3 ) कार्याध्यक्ष : – फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज, सोलापूर जिल्हा .
4 ) संघपती परमपूज्य प्रथमाचार्य चारित्र्य चक्रवर्ती १०८ शांतिसागर महाराजजी पालखी यात्रा (दिंडी महोत्सव) प्रथम वर्ष आचार्यश्रीची कर्मभूमी बारामती ते समाधीभुमी श्री सिद्धक्षेत्र कुंथलगिरी पर्यंत .
5 ) संस्थापक रत्नत्रय पतसंस्था, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी, विजय प्रताप सार्वजनिक वाचनालय, रत्नत्रय कंप्यूटर इंस्टिट्यूट,
अश्या वेगवेगळ्या धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे.
११ सप्टेंबर २००८ रोजी सदाशिवनगर येथे गणधराचार्य कुंथुसागरजी महाराज आणि युवाचार्य गुणधरनंदी महाराजजी तसेच अनेकानेक साधुसंतांच्या शुभ आशीर्वादाने व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून रत्नत्रय शिक्षण संस्थेची स्थापना केली. जी पुढे चालून मांडवे येथे १४ वर्ष यशस्वी वाटचाल करीत आहे. हे सतत कार्य पुढे सुरु ठेवण्यासाठी शैक्षणिक वर्ष सन २००८- २००९ पासून रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी प्रत्यक्षात आणली.

अनेक विद्यार्थ्यांचा त्यांच्या क्षमतेनुसार व्यक्तिमत्व विकास साधणे हेच त्यांचे उच्च ध्येय. त्याचबरोबर येणाऱ्या काही वर्षांमध्ये सर्व सोयींनी सज्ज अद्यावत हॉस्पिटलची स्थापना करणे, शालेय शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींसाठी सर्व सोयींनी युक्त असे वस्तीगृह उभारणे, जैन मंदिर उभारणे, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे आदर्श असा रत्नत्रय गुणवत्ता अभ्यासक्रम तयार करणे अशा अनेक ध्येयाने भारवलेल्या आणि यासाठी नावाप्रमाणेच अनंत प्रयत्न करणारे अनंतलाल दादा यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांना जास्तीत जास्त समाजोपयोगी कार्य करण्याची शारीरिक व मानसिक शक्ती लाभो, हीच भगवंत चरणी प्रार्थना.
असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे रत्नत्रय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. अनंतलाल दोशी यांना समाजहितदक्षक ज्ञानदाता या पुरस्काराने पंढरपूर येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी रत्नत्रय परिवाराचे सदस्य अनिल दोशी, महावीर शहा, अजितकुमार दोशी, राजेश दोशी, प्रमोद दोशी, मृणालिनी दोशी, विनयश्री दोशी, पुनम दोशी, संध्या काटकर, अभिजीत दोभाडा, निलेश पेनुरकर, परेश मरवडेकर, ज्ञानेश राऊत, अमित पाटील, दैवत वाघमोडे, समीर देशपांडे सकल जैन समाज, रत्नत्रय शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng