मांडवे (बारामती झटका)
रत्नत्रय परिवाराचे संस्थापक मा.श्री. अनंतलाल (दादा) दोशी यांना सन्मती सेवा दल अकलूज व 1008 भगवान महावीरजन्म कल्याण प्रभावना महोत्सव पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजहितदक्षक ज्ञानदाता हा पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन श्री. ज्ञानेश राऊत व हरि (भाऊ) पालवे यांनी सदाशिवनगर, राऊत वस्ती या ठिकाणी केले होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज पानसरे सर यांनी केले यावेळी त्यांनी श्री. अनंतलाल (दादा) दोशी यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी बीजेपी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब सरगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक प्रशांत रुपनवर, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम चव्हाण, रत्नत्रय पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय गांधी, संचालक प्रमोद दोशी, जगदीश राजमाने, सुरेश गांधी, अजय गांधी, रामदास गोफणे तसेच सकल जैन समाज सदाशिनगर, पुरंदावडेचे प्रशांत भैय्या दोशी, राहुल दोशी, बाहुबली दोशी, तनोज शहा, तुषार गांधी, अभिजित दोशी, राजाराम मगर पेट्रोल पंपाचे मालक श्री. लक्ष्मण मगर, नरुटे मामा, शहाजी देशमुख, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ भोसले व त्यांचे कार्यकर्ते भाऊ भोंगळे, समाधान मिसाळ, सतीश बनकर, वैभव शहा, अमित गांधी, संभाजी सुळे, पोपट करे, मोहिद्दिन पठाण, धर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन प्रताप सालगुडे पाटील, सुभाष सुदणे, हॉटेल सागरचे मालक सागर पालवे, सोमनाथ राऊत, बंडू राऊत, दत्तात्रेय वाघुले, रत्नत्रय इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अमित पाटील सर व त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ, रत्नत्रय पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, पिग्मी एजंट ओंबासे पाटील, जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य, उमेश पिसाळ, पार्वती जाधव, पुष्कर दोशी, रत्नेश दोशी, निर्जरा दोशी, साईराज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, पुरुंदावडे गावचे उपसरपंच संतोष शिंदे, राऊत परिवार, पालवे परिवार व परिसरातील विविध मान्यवरांनी यावेळी श्री. अनंतलाल (दादा) दोशी यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही दिल्या.

यावेळी सत्काराला उत्तर देताना, दादांनी सर्वांचे मनापासून आभार मानले असेच सर्वांचे प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आनंद शेंडगे सर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng