Uncategorizedताज्या बातम्या

रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी व सन्मती सेवा दलाचे अध्यक्ष वीरकुमार दोशी यांचा वाढदिवस वही पेन स्वीकारून अनोख्या पद्धतीने होणार.

माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते पिता-पुत्रांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा शुभारंभ

सदाशिवनगर (बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील सर्वसामान्यांचे आधारवड व रत्नत्रय परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री‌. अनंतलाल दोशी उर्फ दादा व सन्मती सेवादलाचे अध्यक्ष श्री. वीरकुमार दोशी उर्फ भैय्या यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि. 15/7/2022 रोजी सकाळी 10.00 वा. माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या शूभहस्ते भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री. अनंतलाल दोशी व श्री‌. विरकुमार दोशी यांचा वाढदिवस रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल मांडवे या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

सदाशिवनगर परिसरातील सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, अशी विनंती रत्नत्रय परिवारामार्फत करण्यात आलेली आहे.

वाढदिवसानिमित्त येणाऱ्या सर्वांना विनंती आहे की, हार व फेटे सत्कारासाठी स्वीकारले जाणार नाहीत. त्याऐवजी पेन व वही आणावी, त्याचा उपयोग गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी होतो. हार व फेटे याचा वायफट खर्च न करता आपापल्या परीने आपणास शक्य आहे, तेवढ्याच वह्या घेऊन याव्यात, असे आव्हान सत्कारमूर्ती पिता पुत्र यांनी केलेले आहे.

रत्नत्रय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल जोशी उर्फ दादा यांनी किराणा व्यवसायामध्ये सदाशिवनगर पंचक्रोशीमध्ये आपले नाव कोरले आहे. त्यांनी उद्योग व्यवसायाबरोबर रत्नत्रय पतसंस्थेस सुरुवात केली. पतसंस्थेला खातेदार व सभासद ठेवीदार यांनी उदंड प्रतिसाद देऊन संस्था प्रगतीच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला इंग्रजी शिक्षण मिळावं यासाठी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना करण्यात आली.

केजी पासून दहावीपर्यंत इंग्रजी माध्यम सुरू करून अनेक विद्यार्थी इंग्रजी शिक्षण घेत आहेत. पहिली ते बारावीपर्यंत रत्नत्रय विद्यालय व जुनिअर कॉलेज स्थापन करून परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केलेली आहे. ग्रामीण भागातील लोकांना येण्या-जाण्याकरिता स्कूल बस सुरू करून विद्यार्थ्यांची सोय केलेली आहे. सुसज्ज इमारत त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान घेण्याकरता सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. वीरकुमार आणि प्रमोदभैया अशी दोन मुले आहेत. वडिलांचा वसा, वारसा पुढे घेऊन दोघांचीही वाटचाल सुरू आहे. रत्नत्रय शिक्षण संस्थेचा कार्यभार प्रमोदभैया पाहत आहेत. तर पतसंस्थेचा कार्यभार वीरकुमार भैया सांभाळत आहेत. किराणा किरकोळ व होलसेल व्यवसाय अनंतलाल दादा पाहत आहेत. त्यांना वीरकुमार आणि प्रमोदभैया यांची मोलाची साथ मिळत आहे. राम लक्ष्मणासारखी जोडी उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी झालेली आहे.

विरकुमार दोशी यांनी उद्योग व्यवसाय सांभाळत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलेले आहे. सध्या रत्नत्रय पतसंस्थेचे चेअरमन श्री सन्मती सेवा दल माळशिरस तालुका अध्यक्ष, विजय प्रताप सार्वजनिक वाचनालय सदाशिवनगर अध्यक्ष, माळशिरस तालुका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, श्री भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे सदस्य आहेत. फेडरेशन ऑफ ह्यूमन जैन समाज महाराष्ट्र राज्याचे सदस्य आहेत. प्रथमाचार्य शांतीसागर पालखी पदयात्रा बारामती कुंतलगिरीचे सहसचिव आहेत. रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीवर मार्गदर्शक आहेत. विजय प्रताप सार्वजनिक वाचनालय सदाशिवनगरचे अध्यक्ष असे अनेक पदावर कार्यरत आहेत.

यशस्वी पिता आनंदलाल दोशी व शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असा असणारा पुत्र वीरकुमार दोशी. अशा पिता-पुत्रांच्या वाढदिवसानिमित्त वही पेनचा अनोख्या उपक्रमाबरोबर रक्तदान व वृक्षारोपण करून साजरा करण्याचा मनोदय रत्नत्रय परिवार उद्योग समूहाने आयोजित केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort