रत्नत्रय शैक्षणिक संकुलमध्ये इयत्ता 10 वी चा निरोप समारंभ संपन्न…

मांडवे (बारामती झटका)

रत्नत्रय इंग्लिश मेडिअम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे शुक्रवार दि. 11 मार्च 2022 रोजी शैक्षणिक वर्ष 2021- 2022 मधील इयत्ता 10 वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष श्री. अनंतलाल दोशी, मार्गदर्शक विरकुमार दोशी, सचिव श्री. प्रमोद दोशी, श्री. देविदास ढोपे, श्री. रामदास कर्णे, चंद्रकांत तोरणे, श्री. सुहास काळे, श्री. स्वप्नील भोसले, मुख्याध्यापक श्री. श्रीकृष्ण पाटील, श्री. दैवत वाघमोडे आदींसह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री.अनंतलाल दोशी यांनी स्वीकारले.

निरोप समारंभ कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रमुख अथितींच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. चि. रवींद्र काळे, प्रथमेश जाधव, कु. नम्रता मोरे, रिया दोशी, स्नेहल नारनवर, रेणुका मोहिते, जास्मिन मुलाणी, गायत्री मोघे, साक्षी पालवे, प्रतीक्षा शेंडगे या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ कार्यक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त केले. संस्थेचे सचिव श्री. प्रमोद दोशी यांनी हा निरोप समारंभ नसून हा शुभेच्छा समारंभ आहे, असे म्हटले. विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे तसेच पुढील शैक्षणिक वर्षांपासून आर्ट्स आणि कॉमर्स संस्थेमध्ये सुरू करणार असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी विद्यालयाचे नाव उज्ज्वल करतील अशी आशा व्यक्त केली व विद्यार्थ्यांना परीक्षा व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी यांनी आजच्या कार्यक्रमामुळे त्यांना त्यांच्या इयत्ता 11 वीच्या वर्गाची आठवण झाल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अश्याप्रकारे निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधवी रणदिवे यांनी केले तर प्रास्ताविक श्री. दैवत वाघमोडे व आभार प्रदर्शन श्री. विरकुमार दोशी यांनी व्यक्त केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या 13 जागांसाठी 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.
Next articleस्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर! परीक्षेची तयारी करा तेही मोफत!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here