मांडवे (बारामती झटका)
रत्नत्रय इंग्लिश मेडीयम स्कूल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे सोमवार दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी जागतिक विज्ञान दिनानिमित्त स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. अविनाश दोशी नुतन नगरसेवक नातेपुते, श्री. मिहीरभाई गांधी संस्थापक अध्यक्ष श्री सन्मती सेवा दल, रत्नत्रय परिवार संस्थापक अध्यक्ष श्री. अनंतलाल दोशी, सचिव श्री. प्रमोद दोशी, डॉ. निवास गांधी, श्री. देविदास ढोपे, श्री. रामदास कर्णे, श्री. विरेंद्र दोभाडा, श्री. श्रीकांत शहा, डॉ. रेश्मा गांधी, सौ. सारिका राऊत, सौ. ज्योती राऊत, सौ. पार्वती जाधव, मुख्याध्यापक श्री. दैवत वाघमोडे व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री. मिहीरभाई गांधी यांनी स्वीकारले.
विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रमुख आथितींच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, भगवान महावीर व सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
कु. मृणालिनी लवटे, कु. श्रेया गोरे, कु. सारथी वाघमोडे या विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाबाबत आपले विचार व्यक्त केले. तसेच प्रशालेतील सौ. प्रगल्भा कारंडे यांनी विज्ञान दिनाबद्दल माहिती सांगितली.
संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दोशी व कार्यक्रमाचे अध्यक्ष मिहीर भाई गांधी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम सुरू झाला विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक प्रयोग, प्रतिकृती तयार करून आणल्या होत्या. अश्या प्रकारे विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम प्रसन्न वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सागर देशमाने यांनी केले तर, प्रस्ताविक श्री. दैवत वाघमोडे व आभार प्रदर्शन श्री. देविदास ढोपे यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng