मांडवे (बारामती झटका)
श्री सन्मतीसेवा दल व श्री 1008 भगवान महावीर जन्म कल्याणक प्रभावन महोत्सव पंढरपूर महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नत्रय परिवार सदाशिवनगरचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनंतलाल दोशी यांना डॉ. श्री. सतीश दोशी, श्री. मिहीर गांधी यांच्या शुभहस्ते ‘समाजहित दक्षक ज्ञानदाता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्याबद्दल रत्नत्रय शैक्षणिक संस्थेच्या वतीने अभिनंदनपर सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सत्कारमूर्ती श्री. अनंतलाल दोशी, सौ. मृणालिनी दोशी, श्री. अजितकुमार दोशी, श्री. विरकुमार दोशी, श्री. प्रमोद दोशी, श्री. वैभव शहा, श्री. अमित व्होरा, श्री. रामदास कर्णे, दत्ता भोसले, बंडू पालवे, श्री. श्रीकृष्ण पाटील, श्री. दैवत वाघमोडे, सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री. अनंतलाल दोशी यांना वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. त्यामध्ये राष्ट्रसेवा पुरस्कार, राजीव गांधी सन्मान पुरस्कार, जैन गौरव पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, आदर्श व्यापारी पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. अभिनंदन सोहळ्याच्या या कार्यक्रमात श्री. अनंतलाल दोशी व सौ. मृणालिनी दोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित सर्वांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर सौ. सविता देसाई, कु. वनिता निंबाळकर, सौ. माधवी रणदिवे, श्री. पांडुरंग माने, श्री. विकास रुपणवर आदी शिक्षकांनी आपले विचार मांडले.

पत्रकार श्री. बंडू पालवे यांनी आम्ही प्रत्येक कार्यात दादांच्या बरोबर असल्याचे आश्वासन सदर कार्यक्रम बोलताना दिले. या अभिनंदन सोहळ्याप्रसंगी श्री. अनंतलाल दोशी बोलताना दादा म्हणाले की, आत्तापर्यंत मला मिळालेले पुरस्कार, सन्मान हा माझ्या एकट्याचा नसून तो माझ्या कुटुंबातील व समाजातील सर्व सदस्य यांच्या सहकार्यानेच मिळाला आहे, त्यामुळे हा पुरस्कार सर्वांचा आहे.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना गोड चिलेबी वाटून कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अक्षदा तळवलकर यांनी केले तर प्रस्ताविक श्री. दैवत वाघमोडे व आभार प्रदर्शन कु. शिर्के मॅडम यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng