मांडवे (बारामती झटका)
रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी संचलित, रत्नत्रय इंग्लिश मेडिअम स्कूल, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडवे येथे दि. 1 मे 2022 रोजी संस्थापक अध्यक्ष श्री. अनंतलाल दोशी यांच्या अध्यक्षतेखाली व श्री. यशराज राजकुमार दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार दिन उत्साहात पार पडला.
दि. 1 मे 2022 रोजी रत्नत्रय शैक्षणिक संकुलात सर्वप्रथम सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री. यशराज दोशी प्रतिष्ठित व्यापारी, यश लाइफस्टाईल नातेपुते यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर वार्षिक निकाल वाचन व ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रम बोलताना चेअरमन श्री. प्रमोद दोशी यांनी पुढील शैक्षणिक वर्षात सर्व विद्यार्थी 90% च्या पुढे गुण मिळवतील अशी अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रसाठी श्री अनंतलाल दोशी, श्री यशराज दोशी, श्री विरकुमार दोशी, श्री. प्रमोद दोशी, श्री वैभव शहा, श्री बाहुबली दोशी, श्री सोहील दोशी, श्री अतुल दोशी, श्री विराग दोशी, श्री. सुयोग दोशी, श्री. रामदास गोफणे, श्री. दत्ता भोसले, श्री. ज्ञानेश राऊत, श्री. अमित पाटील, श्री. दैवत वाघमोडे, सर्व पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधवी रणदिवे व आभार प्रदर्शन श्री. कु. वनिता निंबाळकर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng