रत्नाई कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी साजरी केली एक अनोखी धुळवड…

अकलूज (बारामती झटका)

आपल्या पौराणिक शास्त्रात असे म्हटले आहे की, पृथ्वीवरील प्रत्येक जीवमात्राचा देह हा पंच महाभूतांपासून बनलेला असतो. त्याची पृथ्वीपासून सुरुवात आणि आकाशामध्ये शेवट असे पंचक असणाऱ्या या तत्त्वांना आदर व्यक्त करणारा दिवस म्हणजे धुळवड किंवा धुलीवंदन. या दिवसाचे औचित्य साधून डॉ. योगेशदत्त तुकाराम जाधव यांच्या दृष्टीकोनातून व चतुर्थ वर्षांमधील रेशीमशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सामाजिक भान ठेवून एक अनोखा अशा उपक्रमाच्या माध्यमातून धुळवड साजरी करण्यात आली.

आज वृद्धाश्रम म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. बऱ्याच वेळेला तरुण पिढी आपल्या जवळपास असणाऱ्या वृद्धांकडे दुर्लक्ष करताना दिसते आणि हाच एक उद्देश नजरेसमोर ठेवून काही तरुण विद्यार्थ्यांना घेऊन सर्वांनी गोविंद वृद्धाश्रम, टेंभुर्णी येथे सदिच्छा भेट दिली. हेतू एकच होता की, त्या वृद्धांच्या मनामध्ये रेखाटलेला गडद काळा रंग काढून काही काळापर्यंत जरी आम्ही त्यांचे आयुष्य रंगबेरंगी करू शकलो तरी आम्ही स्वतःला नशीबवान समजू. त्यादिवशी आम्ही त्या सर्व वृद्धांबरोबर बसून विविध फळे, फरसाणा याचा पोटभर अल्पोपहार केला. त्यानंतर त्यांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विविध वस्तू जसे की अंगाचा साबण, कपड्याचा साबण, पावडर, तेल याचे पाकिट तयार करून वाटण्यात आले. त्यांच्याशी तीन ते चार तास संवाद साधण्यात आला.

यामध्ये प्रत्येकाची एक वेगळी व्यथा व कथा ऐकून सर्व तरुण वर्ग मनाने हेलावून गेला होता. त्याच वेळी आम्ही सर्वांनी मिळून एकच पण केले की, वर्षातील काही सण आपण असेच काही गरजूंमध्ये घालवून, त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करायचा.
अशा नावीन्यपूर्ण गोष्टी करण्यास सदैव प्रेरणा देणारे शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे माजी अध्यक्ष मा. श्री जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष मा. श्री संग्रामसिंह मोहिते पाटील, मा. कु. स्वरुपाराणी मोहिते पाटील, संस्थेचे सचिव, सहसचिव, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य, प्राचार्य व सर्व प्राध्यापक वृद्धांचे आम्ही आभारी आहोत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडाळींब दशा आणि दिशा – भाग – १ – सतीश कचरे
Next articleएकशिव विकास सेवा सोसायटीवर काँग्रेस, राष्ट्रवादीचा झेंडा फडकला, भाजपचे विद्यमान सरपंच यांच्या मातोश्रींचा दारुण पराभव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here