रत्नाई कृषी महाविद्यालयाचे डॉ. वाय. टी. जाधव यांचा राज्य पुरस्कारांने सन्मान

अकलूज (बारामती झटका)

रत्नाई कृषी महाविद्यालयाचे डॉ. वाय. टी. जाधव यांना कृषि शिक्षण, संशोधन व सेवा क्षेत्रातील राज्य पुरस्कार मिळाला आहे. त्यानिमित्ताने डॉ. वाय. टी. जाधव यांनी त्यांच्या सरांविषयी आदर व्यक्त केला आहे.

ते म्हणतात,
आदरणीय सर, माझ्या व माझ्या कुटुंबियांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. हा कृषी शिक्षण, संशोधन व सेवा क्षेत्रातील मला मिळालेला राज्य पुरस्काराचा बहुमान हा मी प्रामाणिकपणे समजतो की तो माझ्या एकट्याचा नसून तो तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे, वेळोवेळी पेरलेल्या दृष्टिकोनामुळे, कायम आम्हा सर्वांना केलेल्या मार्गदर्शनामुळे, आपुलकीने टाकलेल्या पाठीवरील थापेमुळे आणि विशेषतः माझ्या डोक्यावर असलेल्या कायमच्या आशीर्वादामुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे हा राज्यपुरस्कार मी माझ्या कर्मभूमी असलेल्या रत्नाई कृषी महाविद्यालयास अर्पण करीत आहे आणि तुम्हांस आश्वासित करतो की, मी यापुढे देखील नाविन्यपूर्ण दृष्टिकोण ठेवून सदैव आणि प्रामाणिकपणे कार्य करेन करीत राहीन.
अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्याला श्रीकांतजी भारतीय यांच्या रूपाने तिसरा आमदार मिळाला आहे.
Next articleविधी क्षेत्रातील परिस असणारे जेष्ठ विधीतज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांच्या संपर्कात ॲड. प्रशांत रुपनवर पाटील यांचा कायम सहवास असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here