रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे ८ ते १० कोटी रुपये तात्काळ देण्यात यावे, यासाठी रिपाईचे माजी तालुकाध्यक्ष नरेंद्र भोसले यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ २ हजार व माळशिरस तालुक्यातील ३०० घरकुल लाभार्थी यांचे शेवटचे घरकुल हप्ते रोजगार हमी योजनेच्या संगणकीय कार्यप्रणाली (सर्व्हरमुळे) घरकुल लाभार्थी यांना २०,००० हजार मिळाले नाहीत. यामुळे जिल्ह्यातील रमाई घरकुल लाभार्थी यांनी शेवटचा हप्ता घेतला नाही. जर शेवटचा हप्ता घेतला तर रोजगार हमी योजनेअंतर्गत मिळणारे २० हजार मिळणार नाहीत. यासाठी सर्व लाभार्थी शेवटचा हप्ता घेत नाहीत. यामुळे जवळजवळ ८ ते १० कोटी रुपये सरकारी तिजोरीत पडून आहेत, ते तात्काळ मिळावेत, याबाबत पालकमंत्री यांना निवेदन देवून याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी रिपाईचे माजी माळशिरस तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले यांनी केली.

व्यस्त कार्यक्रम असताना सविस्तर माहिती विचारून कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले, याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे रिपाईचे माजी माळशिरस तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले यांनी विशेष आभार मानले.

तसेच या निवेदनाच्या प्रती आ. रणजितसिंह मोहिते पाटील (आमदार विधान परिषद) व आ. रामभाऊ सातपुते (माळशिरस तालुका, विधानसभा) यांनाही देण्यात आले. त्यांनी ही याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुका विधानसभेचे आमदार रामभाऊ सातपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धैर्यशील मोहिते पाटील, माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील, रामहरी सावंत पाटील, उपसभापती प्रतापराव पाटील, उपनगराध्यक्ष भिमराव रेडे पाटील, अरूण तोडकर (जिल्हा परिषद सदस्य), शिवाजी ठोकळे तालुका संघटक, आदी जेष्ठ नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleCan You Use Notepad on Mac? Exploring Alternatives and Workarounds
Next articleलोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या शुभहस्ते ‘द क्लासिक मोबाईल’ शॉपीचा उद्घाटन समारंभ…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here