सोलापूर (बारामती झटका)
रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांची अर्थवाहिनी रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकिनिमित्त पूर्ण सोलापूर जिल्ह्याचा झंजावत प्रचार दौऱ्या निमित्ताने रयत सेवक मित्रमंडळाचे पॅनल उभे आहे.
यानिमित्ताने सोलापूर जिल्हा अध्यक्ष रयत सेवक मित्र मंडळ श्री. दादासाहेब गाडे यांनी सांगितले की, ही बँक सभासदाच्या ताब्यात असावी आणि सभासदांच्या हितासाठी संचालक मंडळाने काम करावं, मित्र मंडळाचे पॅनल निवडून आल्यानंतर सभासद यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, या बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तीन पॅनलमध्ये निवडणूक होत आहे. ही निवडणूक महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणारी ही बँक आहे.


या बँकेच्या 21 शाखा आहेत. तसेच सुमारे अकरा हजार सभासद आहेत, सतरा संचालक निवडून द्यायचे आहेत, ही निवडणूक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. नंदकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे. कारभार पारदर्शी केला जाईल.
नुकताच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, भाळवणी, सोलापूर, कुसुर, कुरुल अशा 36 शाखांमध्ये हा प्रचार दौरा पूर्ण झालेला आहे.मित्र मंडळाला त्याचे निवडणूक चिन्ह घड्याळ आहे. प्रचंड असा प्रतिसाद सभासदातून मिळत आहे. विजयाचा गुलाल रयत मित्र मंडळ उधळणार आहे, असेही दादासाहेब गाडे म्हणाले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
