प्रमुख उपस्थितीत ना. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत
सातारा (बारामती झटका)
पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा १०२ वा वर्धापन दिन सोमवार दि. ४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वा. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयात आयोजित केला आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या समारंभास महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेतील विशेष उल्लेखनीय कार्य करणारी महाविद्यालये व विशेष प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात येणार आहे. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत निवडक मान्यवर, रयतसेवक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी सांगितले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng