दहिवडी (बारामती झटका)
राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या सुकन्या हर्षदा देशमुख जाधव यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या निवडीचे पत्र हर्षदा देशमुख यांना दिले आहे. प्रशासनातील कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त सनदी अधिकारी माजी कृषी आयुक्त प्रभाकर देशमुख यांची सुकन्या सौ. हर्षदादीदी देशमुख – जाधव यांची रयत शिक्षण संस्थेच्या मंडळावर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून मानाचा फेटा बांधून पर्यावरणाचे समतोल राखणाऱ्या वृक्षाची भेट देऊ पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राहुलदादा टिक-पाटील, डॉ.सचिन चव्हाण, विनोद भोसले, बारामती झटका वेब पोर्टल व यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी उपस्थित होते.

हर्षदा देशमुख या उच्चशिक्षित असून सध्या त्या के.जे. एज्युकेशन इन्स्टिट्यूट, पुणे तसेच ड्रीम सोशल फाउंडेशन या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणून काम पाहत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे पुणे येथे मोठे काम आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्या ड्रीम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून माण व खटाव तालुक्यातील महिलांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng