रविवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटरचे उद्घाटन

मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे राहणार उपस्थित

करमाळा (बारामती झटका)

खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर चे उद्घाटन रविवार दि. ३० ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६ वाजता करमाळा येथे होणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख दीपक पाटणे यांनी केले आहे.

करमाळा शहर तालुक्यातील रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर ही अत्यावश्यक सेवा होती. ही सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते. मात्र आता या सुविधेमुळे करमाळ्यातच ही सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वीच करमाळा येथे श्री कमला भवानी ब्लड बँक उभारणी करून रक्ताची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी खासदार सुजय विखे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, आ. शहाजी बापू पाटील, आ. संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, जयंतराव जगताप, रश्मीदीदी बागल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती रोहित वायबसे यांनी दिली आहे.

करमाळा येथील रुग्णांची सेवा करण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अपेक्स किडनी सेंटर या अत्याधुनिक कंपनीच्या माध्यमातून ही सेवा करमाळ्यात उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत पक्षाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणातील रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना रविवारी मंगेश चिवटे यांची भेट घ्यावी, असे आवाहन रोहित वायबसे यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगोरडवाडी येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प. अनिल तुपे, महाराज नाशिक यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे
Next articleकरमाळा नगरपालिका स्वबळावर लढवा – प्रा. शिवाजीराव सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here