रशिया – युक्रेन संघर्ष वाढलेल्या खाद्यतेलाच्या किंमती व त्यावरील उपाय – मंडळ कृषि अधिकारी सतीश कचरे

नातेपुते (बारामती झटका)

आपला भारत देश स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे व या अमृतमहोत्सवात आपण शेतकरी बांधव खाद्य तेल उत्पादनासाठी स्वयंपूर्ण होण्यासाठी प्राप्त परिस्थिती, उपलब्ध साधन सामुग्री याचा पुरेपुर वापर करून पिक पद्धतीत फेरबदल न करता खात्रीचा हमीभाव, उच्च उत्पादनक्षमता, जमिनीचा पोत सुधारणारी आपल्याकडील मुख्य पीक ऊस, केळी, फळपिके यामध्ये टोकन पद्धतीने आंतरपीक म्हणून सुर्यफुल, सोयाबीन, भुईमुगाची या तेलवर्गीय पीकाची लागवड करणे काळाची गरज होऊन बसली आहे. आपण मौल्यवाण परकीय चलन खर्ची पाडून ८०% खाद्यतेलाची आयात पैकी जवळपास ६०% युक्रेन व २०% रशिया व इतर देशाकडून करावी लागते. परंतू सद्य परिस्थितीत रशिया युक्रेन संघर्षामुळे खाद्य तेल पुरवठा विलंबामुळे खाद्य तेल किंमती वाढल्या, अवाक्याच्या बाहेर, गगणाला भिडल्या आहेत. यावर उपाय म्हणून शेतकरी बांधवांनी येत्या खरिप हंगामात आपल्या ऊस, केळी, फळपिके या मुख्य पिकात आंतरपीक किंवा सरळपीक म्हणून सोयाबीन सुर्यफुल, भूईमुग या पीकाची लागवड करावी.

सोयाबीन पीक – सोयाबीनमध्ये १८ ते २०% तेलाचे, ३८ ते ४०% प्रथिनाचे प्रमाण असलेले ८२ ते १०० दिवसात येणारे २५ ते ३० क्वि/हे उत्पादनक्षमता साडेसात ते आठहजार बाजार भाव असलेले मुख्यपिक व अंतरपीकाने जमिनिचा पोत सुधारणारे, मुळापासून बीयापर्यंत पशुखाद्य, पक्षीखाद्य उद्योगासाठी उपयोगी सोयाबीन हे कल्पपीक लागवड करुया. यासाठी जीएस – ९३०५, जीएस – ३३५, एनआरसी ३५, एम एसयुएस – ४१, १६२, १५८ या किड व रोग प्रतिबंधात्मक वाणाची सहज उपलब्ध बियाणे बीजप्रक्रिया करून टोकन पद्धतीने लागवड जून ते जुलैमध्ये करावी.

सुर्यफुल पीक – खरिप हंगामात मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत जून शेवटी ते जुलै महिन्यात टोकन पद्धतीने सरळ किंवा आंतरपीक म्हणून लागवड करून २.५ ते ३ महिन्यात येणारे अकरा हजार प्रति क्वि. उत्पन्न देणारे ८० ते ८५% तेलाचे प्रमाण व हलके कोलेस्ट्रॉल कमी करणारे लिनोलेणीक आम्ल असलेले महत्वाच्या तेलबीया पीकाची मॉडर्न, डीआरएस – १०८, ११३ एलएसएफ – ८ भानू बिएस एच – ७ फुले रविराज या जातीची बीजप्रक्रिया करून केळी, ऊस व फळपिकात लागवड करून खाद्यतेल उत्पादनास हातभार लावू शकतो.

भूईमुग पीक – गरिबाचा काजू या पिकाचे बियात ४८ ते ५२% तेलाचे प्रमाण व मुबलक प्रमाणात लोह व इतर खनिजे आणि जीवनसत्व बी -12 असणारे १०० ते १३० दिवसात येणारे जमिनीचा पोत सुधारणारे पाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम जमिनित फुले, उन्नती फुले, भारती फुले, प्रगती फुले, घनी फुले, ६०२१ जे एल – ५०१, टीएजी -२४, एसबी ११, टीपीजी -४१ या वाणाची लागवड १५ जून ते १५ जुलै पट्टा पद्धतीवर टोकन पद्धतीने केली तर ३० ते ३५ क्विंटल उत्पादन देणारे पीकाची लागवड करून तेल उत्पादनास हातभार लावू शकता. तरी शेतकरी बांधवांना येत्या खरीप हंगामात या पीकाची सरळ किवा आंतरपीक म्हणून लागवड करून खाद्य तेल उत्पादनास हातभार लावावा व हमी भाव खात्रीचे दर यामुळे भरघोष उत्पन व उत्पादन घ्यावे तसेच या पिकाच्या अधिकची माहिती तंत्रासाठी नजीकचे कृषिसहायक व कृषि कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन मंडळ कृषि अधिकारी सतीश कचरे यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleधैर्यशीलभैया यांचा वाढदिवस मोहिते-पाटील यांचे राजकीय गतवैभव प्राप्तीचा दिशा देणारा ठरेल.
Next articleनातेपुते येथील दाते प्रशालेचे सन 1967-68 सालीचे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here