माळशिरस (बारामती झटका)
आज आपण सर्व शेतकरी बांधव सोशल मिडीया, वर्तमान पत्र, न्युज चॅनेल, चर्चा यामध्ये अनुभवतोय की, इंधन वाढ व रशिया-युक्रेन संघर्षामुळे खताचा तुटवडा भासणार आहे. खतांच्या किंमती गगनाला भिडणार आहेत. ह्या बाबी आपल्या नियंत्रणा बाहेरील आहेत. पण यावर आपणाकडे बरेच उपाय व पर्याय उपलब्ध आहेत. रासायनिक खते सहज उपलब्ध होतात व ती वापरणे सोपे होते. परंतू, प्राप्त परिस्थितीत उपलब्ध साधनसामुग्री व उपलब्ध बाबींचा वापर करून पीकाचे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे.
आज मितीस पीक अन्नद्रव्ये उपलब्धतेसाठी पुढील पर्याय उपलब्ध आहेत याचा वापर करणे गरजेचे आहे.
हिरवळीचे खत उदा. ताग, धैंचा, बोरू, चवळी, गवार, सुबाभूळ, करंज, पानाचा वापर करणे. ऊस पाचट कल्चर चा वापर कंपोस्ट शुगरफॅक्टरी प्रेस मड केक, व कंपोस्ट, विविध प्रकारच्या पेंडी, मासळी खत, गांडूळ खत, कोंबडी खत, लेंडी खत, सिटी कंपोस्ट पशुपक्षी विष्ठा मुत्र, मानवी विष्ठा मुत्र, व्हर्मीवॉश शहरी अथवा मानवी वस्ती सांडपाणी बोनमील, फिश मिल, नाडेफ कंपोस्ट इएम द्रावन, अझोला, केफ्र द्रावन, निळे हिरवे शेवाळ, दशपर्णी अर्क, व्हर्मीवॉश, जीवामृत बीजामृत अमृतपाणी, गोमुत्र शीग खत खुरांचे खत, भुईमुग पेंड, करडई पेंड, एरंडी पेंड, करंजपेंड, निमपेंड, मोहाचीपेड, रक्ताचे खत, गव्हाचे काड, बाजरीचे सरमाड, तुरकाड्या, सुर्यफुल काड्या, भाताचे तुस, कापुस काड्या, फुले येण्यापूर्वीचे सर्व प्रकारचे गवत, बांबुचा पाला, शेतातील पालापाचोळा खत, केळी पाने व बुधा खत, लिंब जंगली, शेवगा, आंबा, पालापाचोळा खत, नारळ व सर्व प्रकारच्या झाडांच्या फांद्या कुजविलेले खत, शेत तलाव मस्त्य पालनाचे पाणी, जीवाणू संवर्धने जी हवेतील नत्र व जमिनितील स्फुरद व पालाश उपलब्ध करून देता ती अझीटोबॅक्टर, रायझोबीएम, असिटोबॅक्टर के. एसबी, पीएसबी अशा १२ प्रकारच्या बॅक्टेरिया इत्यादी तसेच बाजारात उपलब्ध असलेला द्रवरूप युरिया, फॉस्फरिक ॲसीड, उपलब्ध असलेली विविध ग्रेड मधील द्रवरूप खते, सोडीयम क्लोराईड जीप्सम इत्याचीचा उपलब्धता निर्मितीचा वापर करून आपण सर्व पीकाचे एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन समाधानकारक रित्या करू शकतो. म्हणून शेतकरी बंधूनी गोंधळून न जाता विचारांचे वादळ थांबवून उपलब्ध साधने व साधनसामुग्रीचा वापर केला तर निसर्गाशी प्राणी, पशुपक्षी, मानव, सुक्ष्मजीव यांचे बरोबर जिओ जीवस्य जीवनम !! या उक्तीप्रमाणे पीक उत्पादन घेता येईल यात शंका नाही.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng