रस्त्यावर फळे विकणाऱ्याच्या मुलाने रस्त्यावर कामाचे कष्टातून फॉर्च्युनर गाडी घेतली.

आळंदी-पुणे-पंढरपूर महामार्गावरील जमिनी विक्रीतून व भू संपादन पैशातून अनेकांनी अलिशान गाड्या घेतल्या. मात्र, रस्त्यावर काम करून गाडी घेणाऱ्या परिवाराची ही यशोगाथा.

माळशिरस ( बारामती झटका )

मेडद ता. माळशिरस येथील श्रीमंत दगडु सरतापे यांनी आळंदी पुणे पंढरपूर या रस्त्यात फळे विक्रीच्या व्यवसायातून उदरनिर्वाह व प्रपंच चालविणारे पैलवान श्रीमंत दगडू सरतापे यांचे चिरंजीव अतुल सरतापे यांनी आळंदी पुणे पंढरपूर पालखी महामार्ग चौपदरीकरणासाठी विस्तारित झाल्यानंतर सदर रस्त्यावर प्रामाणिकपणे कष्ट करून फॉर्च्युनर गाडी घेतलेली आहे. आळंदी पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील अनेक लोकांनी जमिनीच्या विक्रीतून व महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या जमिनीच्या पैशातून अनेकांनी अलिशान गाड्या घेतल्या मात्र, रस्त्यावर रात्रंदिवस अहोरात्र कष्ट करून फार्च्युनर गाडी घेणार्‍या सरतापे परिवारांची यशोगाथा वेगळी आहे.
श्रीमंत दगडू सरतापे यांचे मूळगाव कारखेल आहे. दगडू सरतापे यांच्या अकाली निधनाने श्रीमंत यांच्या मातोश्री उदरनिर्वाह करता मेडद ता. माळशिरस येथे 1965 साली नातेवाईक यांच्याकडे आलेल्या होत्या. त्याच साली श्रीमंत सरतापे यांचा जन्म झालेला आहे. लहानपणी जन्माआधीच वडिलांचे छत्र हरपलेले अत्यंत प्रतिकूल परिस्थिती अशा वेळेस श्रीमंत सरतापे यांनी कामाला सुरुवात केली. अनेक दिवस हमाली केली आहे.

मेडद येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे जागृत देवस्थान आहे. या भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे श्रीमंत सरतापे यांना कुस्त्याचा छंद लागला. त्यांचे कुस्ती छंद जोपासत आपली स्वतःची आर्थिक प्रगती साधण्याचे काम सुरू होते. 1962 साली फलटण तालुक्यातील आंदरुड गावचे गुलाबराव आढाव यांची कन्या संगीता यांच्याशी विवाह झालेला होता. सौ. संगीता व श्री. श्रीमंत यांनी आपला प्रपंच व्यवस्थित व आपल्या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी पुणे पंढरपूर रोड वरील पंचशील हॉटेल समोर राहण्यासाठी जागा घेतली होती. सदर ठिकाणी रस्त्यावर फळे विक्रीचा स्वतःचा व्यवसाय केलेला आहे. मेडद येथे पोटापुरती शेती होती. त्यामधील उत्पन्न व दुधाचा व्यवसाय करून प्रपंच चालवलेला आहे. श्रीमंत सरतापे यांना अतुल, नितीन, सचिन अशी तीन मुले आहेत. त्यांनी कष्टातून आपली मुले सुशिक्षित केलेली आहेत. अतुल यांनी बीएससी ऍग्री, नितीन बारावीनंतर कॉलेजला, मात्र सचिनने दहावीनंतर शाळा सोडून ड्रायव्हिंगचा नाद असल्याने वाहनाकडे कल होता. अतुल सरतापे यांनी म्हसवड रोड येथील नक्षत्र कॉम्प्लेक्स या ठिकाणी आर्यन ऍग्रो दुकानाचा शुभारंभ केला. सदर ठिकाणी नितीन मदत करत होते. काही दिवस कृषी दुकानाचा व्यवसाय व्यवस्थित चालवलेला होता. दिवसेंदिवस दुकानांची संख्या वाढत गेली. अतुल सरतापे उच्चशिक्षित असल्याने त्यांनी उद्योग व्यवसायाबरोबर राजकारणाची सांगड घातलेली होती. भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, सोलापूरचे खासदार शरद बनसोडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये कामास सुरुवात केली. अतुल सरतापे यांनी प्रामाणिक व एकनिष्ठपणा यामुळे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सत्व परीक्षेमध्ये पास झाले आणि अतुल सरतापे यांच्या राजकीय जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रशासनातील अतुल सरतापे यांची छोटी मोठी कामे केली होती. त्यामुळे अतुल सरतापे यांच्याविषयी समाजात वेगळे स्थान निर्माण झालेले होते. कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याची बदली करण्यामध्ये अतुल यांचा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने सिंहाचा वाटा होता. त्यामुळे अतुल सरतापे यांनी कृषी विभागांमध्ये छोटीमोठी कामे करण्यास सुरुवात केली. प्रामाणिकपणे कष्टातून व कामातून चार रुपये मिळत असल्याने अतुल सरतापे यांना कामे करण्याची आवड निर्माण झाली. आर्यन ॲग्रो व्यवसाय कमी झालेला असल्याने सदर चे दुकान पाहणारे नितीन यांनी एका कंपनीमध्ये नोकरीस सुरुवात केली‌ नितीन यांनीही कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करून दुकानाचा अनुभव असल्याने कंपनीमध्ये विश्वास संपादन करून त्याठिकाणी नितीन यांनीही प्रगती साधलेली आहे.

आळंदी पुणे पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गासाठी रस्त्याचे विस्तारीकरण करण्याचे काम सुरू झाले. धर्मपुरी ते खुडूस रस्ता पालखी महामार्ग विस्तारीकरणासाठी जे. एम. म्हात्रे कंपनी यांनी घेतलेला होता. सदर कंपनीचे पाटणकर यांच्याकडे जबाबदारी होती. अतुल सरतापे यांनी सदरच्या रस्त्यावर काम पाटणकर यांच्या सहकार्याने घेतलेले होते. सदरच्या रस्त्याचे काम सुरू असताना रात्रंदिवस श्रीमंत सरतापे, अतुल सरतापे, सचिन सरतापे कामावर लक्ष ठेवून होते. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता कष्टाला सुरुवात केली. सचिन याला पहिल्यापासून वाहन चालविण्याचा नाद असल्याने मुरूम माती वाहतुकीसाठी टिपर खरेदी केला आणि सरतापे परिवारांच्या भरभराटीला सुरुवात झाली. गेल्या दोन वर्षापासून रस्त्यावर सरतापे परिवारांचे कष्ट सुरू आहे. दिवसेंदिवस प्रगती होत गेली. प्रामाणिक कष्टाचं फळ मिळालं. सरतापे परिवार यांनी फॉर्च्युनर गाडी स्वकष्टातून घेतलेली आहे.
मेडदचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथे गाडीची पूजा भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, सरपंच नाथाआबा लवटे पाटील , माजी सरपंच युवराज झंजे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत फॉर्च्यूनर गाडीची पूजा करण्यात आली. राजकीय दैवत माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सोलापूर येथील निवासस्थानी जाऊन गाडीची पूजा करण्यात आली. त्यावेळी लोणंद पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष शेतकऱ्यांचे नेते एडवोकेट सोमनाथ वाघमोडे, युवा नेते श्रीयश मुंडे उपस्थित होते.

अतुल सरतापे यांचे राजकीय गुरु पालकमंत्री विजयकुमार देशमुख आहेत. भाजपमध्ये अनेक पदावर त्यांच्यामुळे काम करण्याची अतुल सरतापे यांना संधी मिळाली होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून अतुल सरतापे यांना उमेदवारी दिली होती‌ स्वतः पालकमंत्री प्रचारासाठी आलेले होते. त्यावेळेस अंतर्गत बंडाळीमुळे अतुल सरतापे यांचा पराभव झालेला होता. पराभवाने खचून न जाता अतुल सरतापे यांचे भाजपमध्ये काम सुरूच आहे. सध्या भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस पदावर आहेत. माढा लोकसभेचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्या निवडणुकीच्या वेळी अतुल सरतापे यांनी चांगले काम केलेले होते . अतुल सरतापे यांनी आपली कष्टातून आर्थिक प्रगती साधलेली आहे. भविष्यात निष्ठेतून राजकीय परिस्थिती सुद्धा सुधारणार असून अच्छे दिन येणार आहेत. सध्यातरी सरतापे परिवार यांनी प्रतिकूल परिस्थितीतून कष्ट हेच भांडवल यामधून गगन भरारी घेतलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलोणंद पंढरपूर रेल्वेचा मार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.
Next articleअकलूजमध्ये राईज टू फिटनेस या अत्याधुनिक सुसज्ज अशा भव्य जिमचा शुभारंभ संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here