पिलीव (बारामती झटका)
पिलीव ता. माळशिरस येथील रहिवासी व जि प प्रा शाळा करांडेवाडी केंद्र तांदूळवाडी येथे कार्यरत असलेल्या आदर्श शिक्षिका आनंदी काळे मॅडम या दरवर्षी शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा रांगोळीतून साकारतात. यावर्षी देखील त्यांनी 8 फूट लांब व 6 फूट रूंद अशी भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा रांगोळीच्या माध्यमातून त्यांच्या घरी साकारली होती. त्यांनी दोन दिवस परिश्रम घेऊन ही प्रतिमा साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची ही प्रतिमा पाहण्यासाठी पिलीव गावातील सर्व शिवप्रेमी, मित्र मंडळी दिवसभर येत होती.
यामध्ये प्रामुख्याने संग्रामसिंह जहागिरदार साहेब मा. सभापती जि. प. सोलापूर, केंद्रप्रमुख शैलजा जाधव मॅडम, डॉ. दिलीपराव पवार, ग्रामपंचायत सदस्य अविनाश जेऊरकर, सचिन गाटे सर, विजय धायगुडे सर या सर्वांनीच त्यांच्या रांगोळीचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिलीव च्या आदर्श शिक्षिका सौ. पद्मिनी धायगुडे मॅडम यांच्याहस्ते त्यांचा हार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng