राजकीय धांदलीच्या स्थितीत आमदार रामभाऊ सातपुते यांनी दाखवली कार्य तत्परता.

माळशिरस (बारामती झटका)

राज्यात दि. १० जून रोजी चालू झालेली राजकीय गरमागरमी अजूनही चालूच आहे. याच स्थितीत सर्वपक्षीय आमदार हे मुंबईत तळ ठोकून आहेत. याच घाईगडबडीच्या स्थितीत माळशिरसचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांनी मतदार संघातील एका गरीब विद्यार्थ्याच्या ट्विटची दखल घेऊन त्याला केलेली मदत चर्चेचा विषय ठरत आहे.

माळशिरस तालुक्यातील कळंबोली गावच्या वेल्लोर इन्सि्टट्यट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत निवड झालेल्या वैभव पवार या गरीब होतकरू विद्यार्थ्याने आपली आर्थिक परिस्थीती बेताची आहे, असे सांगत पुढील शिक्षणासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया माळशिरस शाखेकडून शैक्षणिक कर्ज मिळावी अशा आशयाचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहून त्याबद्दल ट्विट केले होते. समाजमाध्यमांवरदेखील लोकांच्या समस्या सोडवण्यात कर्तव्य तत्पर असणारे आ. रामभाऊ सातपुते यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ या विषयात लक्ष घालून सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून सदर विद्यार्थ्याला शैक्षणिक कर्ज मिळेल याची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. मुंबईमध्ये पक्ष संघटनेचे कर्तव्य बजावत असताना मतदारसंघातील कामांबाबतही ते तेवढेच दक्ष असल्याची प्रचिती आली आहे. समाजमाध्यमांचा वापर करुन लोकांच्या समस्या फक्त जाणून न घेता त्या सोडवण्याच्या दृष्टीने काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांची ओळख अशा उदाहरणातून ठळक होत चालली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशिंदे सरकारचा नवा धक्का – विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांची नवी यादी पाठवणार.
Next articleमाळशिरस पंचायत समितीच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर विविध सुविधांचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here