राजकीय मोती साबण उद्यापासून समाजामध्ये दिसणार…

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अडगळीतील नेते मंडळी उजेडात येणार, दिवाळीत जसा मोती साबण दिसतो तसेच राजकारणी निवडणुकीत दिसणार.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीच्या 22 जागा व जिल्हा परिषद सोलापूरसाठी 11 जागा माळशिरस तालुक्यामध्ये निवडल्या जाणार आहेत. सदरच्या निवडणुकीसाठी उद्या माळशिरस व सोलापूर येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अडगळीतील नेतेमंडळी उजेडात आलेली दिसणार आहेत. दिवाळीत जसा मोती साबण सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला दिसतो, तसेच काही राजकारणी निवडणुकीत दिसणार आहेत. राजकीय मोती साबण उद्यापासून समाजामध्ये वाड्या वस्त्यावर चौकाचौकात गावागावात दिसणार आहेत.

निवडणूक सुरू झाली की, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते मंडळी यांना समाजाचा व भावभावकीचा पुळका येतो, अडचणी दिसतात, मदत करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते, असे आजपर्यंत चित्र होते. मात्र, कोरोनासंसर्ग रोगाने सर्व काही सांगितले आहे. जवळचा कोण लांबचा कोण, अडचणी सोडविण्यासाठी मदत कोणी केली, अडचणीत असताना कोणी गुंगारा दिला, याचा हिशोब सर्वसामान्य जनता देणार आहे. कोरोनाच्या कालावधीत लाईफ बॉय व लक्स साबणाने जनतेची कोरोना संसर्ग रोगाच्या लागणीपासून बचाव केलेला आहे, असे नेहमी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी व उपयोगी पडणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना जनता डोक्यावर घेणार आहे.

मात्र दिवाळीत जसा मोती साबण दिसतो तसे नेते व कार्यकर्ते निवडणुकीत दिसल्यानंतर जनता पायदळी तुडवेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोती साबणापेक्षा लाईफबॉय व लक्स साबणासारखे वागणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येतील, असे एकंदरीत जनतेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कदाचित मोती साबण लक्स व लायबॉयच्या बॉक्समध्ये सुद्धा येऊ शकतात. आरक्षण जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्राची लटकेच्या क्रिडा क्षेत्रातील कामगिरीमुळे संत गाडगेबाबा विद्यालयाचा नावलौकिक उंचावला – केंद्रप्रमुख रोहिदास कापसे
Next articleबिहारमधील पटना येथे भारतीय जनता पार्टीच्या संयुक्त मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here