राजकीय वारसा, आरक्षण, वारसदार असे अनेक सरपंच झाले मात्र जिद्द चिकाटी गावच्या विकासाचे ध्येय असणारा सरपंच.

समाजसेवक अण्णा हजारे यांचा आदर्श आणि आदर्श सरपंच पोपटराव पवार यांची प्रेरणा घेऊन सरपंच पदावर काम करणार युवा सरपंचाची यशोगाथा.

अहमदनगर ( बारामती झटका )


समाजामध्ये राजकीय वारसा, आरक्षण, राजकारणातील वारसदार असे अनेक सरपंच आपण पाहिलेली आहे मात्र
खडांबे llबुll गावचे धडाकेबाज नेतृत्व,नागरिकांच्या मानतील आदर्श सरपंच चि कैलासराव पवार यांची जिद्द चिकाटी समाज व गावाविषयी असलेली आत्मीयता यामधून केलेले कार्य आदर्शवत आहे या कार्याचा अनेक तरुण सरपंचांनी आदर्श घ्यावा अशी युवा सरपंचाची यशोगाथा आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या भूमीत आपल्या गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या श्री पोपटराव पवार,समाजसेवक आण्णा हजारे यांच्या पावलावर पाऊल ठेवून अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यात असाच आदर्श सरपंच घडताना दिसत आहे . म्हणजे कृषिविद्यपीठ शेजारी आणि मुळाडॅमच्या पायथ्याशी असलेल्या सुजलाम सुफलाम खडांबे गावचे युवा सरपंच चि. कैलासराव पवार. यांची यशोगाथा प्रेरणा घेणारी आहे.
पशुवैद्यकीय डिप्लोमा आणि पदवीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी समाजकार्याचा ध्यास घेऊन गावच्या सामाजिक कार्यात सार्वजनिक सण उत्सवात, सहभाग घेऊन अडीअडचणी व संकटात असणाऱ्या लोकांना मदतीचा वसा घेतला. सुसंस्कृत व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे पवार कुटुंबीय आहे.त्यांना समाजकार्याचा वारसा लहानपणीच त्यांचे आजोबा कै. लक्ष्मणराव वामनराव पवार यांच्या कडून बाळकडू मिळाले होते.
जानेवारी 2021 मध्ये ग्रामपंचायत निवणूक लढवण्याचा निर्णय घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला.निवडणूक लढवण्यासाठी त्यांना वडील दिलीपराव पवार, चुलते बाळासाहेब, संजय(नाना),शिवाजी, विजय,सचिन(आबा) यांचे मार्गदर्शन लाभले.आणि कैलासराव चुरशीची लढत देत अटीतटीच्या लढतीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले.पुढे सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावच्या जेष्ठ मंडळींनी एकमुखी निर्णय घेऊन चि.कैलासराव पवार यांच्या अंगा मधील समाजसेवा आणि गावच्या विकासाची दूरदृष्टी असल्यामुळे त्यांच्या खांद्यावर बिनविरोध सरपंच पदाची धुरा सोपवली.
9फेब्रुवारी 2021 रोजी वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी सरपंच पदाची शप्पथ घेऊन गावाच्या विकासाचा श्रीगणेशा केला.40-50 वर्षे प्रलंबित असणारा जागेचा प्रश्न सोडवत असताना काही धनदांडग्या व विघ्नसंतोषी लोकांच्या कडून त्रास झाला त्यांना खोट्या केस मध्ये अडकव्यांच्या प्रयत्न केला पण सरपंचांनी कुणाच्या दबावाला न जुमानता अगदी संयमाने गावच्या जागेचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावून त्यांनी शेवटी सत्याचाच विजय होतो हा इतिहास रचला पीडित लोकांचा विश्वास संपादन केला.


कोरोना काळात अनेक प्रतिबंधक उपाययोजना केल्या.आपण स्वतः आपल्या 25 माणसांच्या कुटुंबापासून दूर क्वारांटाइन राहून ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामसेवक आजारी असताना अशा कठीण परिस्थितीत आपण गावचे बिनविरोध सरपंच आहे असा पदाचा अविर्भाव कुठलाच गर्व न करता स्वतःच्या हाताने गावाचा पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू ठेवला.गावच्या प्रत्येक नागरिकांची स्वतः जाऊन चौकशी करून प्रत्येकाला शक्य होईल तेवढे आर्थिक, मानसिक आधार देऊन अनेक लोकांचे मनोबल वाढवले. कोणाच्या काळात गावात संसर्ग रोगाचा फैलाव होऊ नये यासाठी गावामध्ये वेळोवेळी निर्जंतुकीकरणं फवारणी सुरू असताना स्वतः समक्ष उभा राहून फवारणी करून घेतल्या. कोरोना आटोक्यात आणण्याकरता लसीकरण मोहीम हाती घेऊन नागरिकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करून गावात जवळपास 90% लसीकरण शांततेत पार पाडल. अनेक लोकप्रतिनिधींनी कोणाच्या जनतेकडे व त्यांच्या अडचणी कडे पाठ फिरवली होती कठीण अश्या परस्थिती समाजसेवेचे व्रत घेतलेले युवा सरपंच कोविड काळात एक कोविड योद्धा बनून लढत होता.
गावामध्ये समाज उपयोगी गावच्या विकास कामांमध्ये युवा सरपंच लहान-सहान गोष्टीवर लक्ष ठेवून होते. गावचा मुख्य रस्ता काँक्रीटिकनाचे काम , सौरदिवे बसवण्याचे काम , विजेचे खांब उभे करण्याचे काम , गाव स्वच्छ सुशोभित ठेवण्याचे काम असो अशी गावातील विकासाची कामे सरपंच प्रत्येक काम जातीनं लक्ष देऊन प्रामाणिकपणे पूर्ण करून घेत आहेत.


गावात जातीय सलोखा व महिला आणि मुली निर्भीडपणे स्वाच्छंदी आयुष्य जगत आहेत.सरपंचांनी गावात शांतता प्रस्थापित करून गाव शांततेत गुण्यागोविंदाने राहत आहे.
गावातील अंगणवाडी,
जिल्हापरिषद शाळा,परीसरातील हायस्कुल शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी व शिक्षक यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
गावच्या सर्व जाती धर्मातील लोकांच्या सार्वजनिक व व्यक्तिगत कार्यक्रमांमध्ये आवर्जून उपस्थित असतात गावातील मुलींच्या लग्नात सरपंच म्हणून उपस्थित राहत नाहीत नववधूचा पाठीराखा भाऊ म्हणून उभा राहत असतात लग्नसमारंभात उपस्थित राहून कार्यकर्त्या सारखे काम करतात लग्नसमारंभात सरपंच म्हणून मिरवत कधीच सत्कार घेत नाहीत .
गावामध्ये नवीन पिढी सुसंस्कृत सशक्त व उद्योग व्यवसाय करावा यासाठी युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचे , उदयोगधंदे सुरू करण्याचे,नोकरी करण्याचे मार्गदर्शन वेळोवेळी करतात.


गावामध्ये नवनवीन लोक उपयोगी व समाजाच्या हिताच्या योजना राबविण्यात करता काही वरिष्ठ नेत्यांना, अधिकाऱ्यांना भेटून ते नवनवीन सरकारी योजना गावात राबवण्यासाठी प्रयत्नवादी असतात.गावात प्रत्येक सण उत्सव कुठलाही जातीभेद न करता राज्यशासनाचे नियम पाळून पारंपरिक पद्धतीने साजरे करत आहेत.खुप अल्प काळात गावच्या युवकांना सोबत घेऊन जेष्ठ मंडळींचे मार्गदर्शन घेऊन,सहकारी व अधिकारी वर्गाची मर्जी राखत सरपंच कैलास पवार यांनी गावचा चेहरा मोहरा बद्लवण्याचा प्रयत्न केला आहे. शांत,संयमी,प्रामाणिक, कर्तव्यदक्ष , कार्यकुशल सरपंच म्हणून त्यांनी तालुक्यात वेगळाच ठसा उमटवुन तालुकभर त्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.


भविष्यकालच्या नक्षीवर आपल्या कर्तृत्वाने पाऊल उमटवत सरपंच चि कैलासराव पवार यांनी महाराष्ट्रराज्याच्या राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांसमोर वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
खडांबे llबुll गावच्या या धडाकेबाज युवा सरपंचाच्या कार्याला मनाचा मुजरा.आणि त्यांच्या भावी कार्यास कोटी कोटी शुभेच्छा. या नागरिकांच्या मनातील आदर्श सरपंचांच्या हातून असेच गावच्या विकासाचे कार्य घडो व सरपंच चि. कैलासराव पवार यांना उदंड आयुष्य लाभो हीच पंढरीच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना… बारामती झटका परिवार यांचेकडून त्यांच्या उत्तरोत्तर कार्याला लाख लाख शुभेच्छा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसांगोला तालुक्यातील कटफळ हद्दीतील शेतजमीच्या वादातून ड्रॅगन फ्रुट व आंब्याच्या झाडांचे 25 ते 30 लाखाचे नुकसान.
Next articleसिम्बोयासिस युनिव्हर्सिटीचे कार्य कौतकास्पद. – प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here