राज्यपालांच्या विरोधात युवा सेना नातेपुते यांच्यावतीने निषेध सह्यांची मोहीम

अकलूज (बारामती झटका)

युवा सेना माळशिरस तालुक्याच्या वतीने नातेपुते येथे राज्यपालांच्या विरोधात सह्यांची मोहीम युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेना सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व शिवसेना उप तालुका प्रमुख अमोल उराडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.

हिंदूमध्ये फूट पाडणाऱ्या आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा निषेध व्यक्त करण्यासाठी व त्यांना केंद्र सरकारने परत बोलावून घ्यावे याकरता नातेपुते शिवसेना शहर प्रमुख समीर शेख, रुपेश लाळगे, सतीश सपकाळ, धनंजय बोराटे, अक्षय कुचेकर, हिरालाल आतार, अमित भरते, रिहाल तांबोळी, दादा काटकर, किशोर राऊत, शिवम लांडगे, सागर कुचेकर, वर्धमान वसगडेकर, नवा राऊत, अक्षय मिसाळ, मनोज लांडगे, राहुल आगम, विशाल लांडगे, अल्ताफ आतार यांनी सह्यांची मोहीम राबवली. या मोहिमेत सहभागी झालेल्यांचे आभार रुपेश लाळगे यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleघरच्या मातोश्री लक्ष्मीच्या आशिर्वादाने रोडवरच्या लक्ष्मीच्या सहकार्याने अनेक लक्ष्मी पुजण्याचे भाग्य परिवाराला मिळाले
Next articleतरंगफळ गावची लेक, भांबुर्डी गावची सुन यमुना देशमुख भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंचायत समिती भांबुर्डी गणातून इच्छुक….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here